बाईक म्हटलं की, तरुण मंडळींची पहिली पसंती. विविध कंपन्यांच्या अनेक बाईक तरुणांचे लक्ष वेधून घेतात. जर तुम्ही यामाहा कंपनीची पॉवरफुल इंजिन आणि दमदार फिचर्ससह एखादी बाईक घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता यामाहा कंपनी लवकरच भारतात त्यांच्या हटके दोन स्पोर्ट्स बाईक घेऊन येणार आहेत. या स्पोर्ट्स बाईकचे नाव यामाहा आर ३ (R3) आणि एमटी-०३ (MT-03) असे आहे. यामाहाची ब्ल्यू स्केअर डीलरशिपद्वारे या आगामी स्पोर्ट्स बाईक्सची किरकोळ विक्री केली जाईल. कारण या स्पोर्ट्स बाईक १०० शहरांमध्ये उपलब्ध केल्या जाणार आहेत. जपानी ब्रँडने ब्ल्यू स्क्वेअर डीलरशिपला सूचित करून स्पोर्ट्स बाईकसाठी लाँच प्रक्रिया सुरू केली आहे. यामाहा लवकरच भारतात आर३ (R3) आणि एमटी-०३ (MT-03) या स्पोर्ट्स बाइक आणणार आहे. २०२३ च्या सुरुवातीला मोटोजीपी भारत (MotoGP Bharat) बुद्ध इंटरनॅशनल सर्किट (BIC) येथे सप्टेंबरमध्ये या दोन्ही बाईकचे उद्घाटन करण्यात आले होते. बाईकची रचना करणारे (Bikemaker) १५ डिसेंबरला या दोन्ही स्पोर्ट्स बाईक लाँच करणार आहेत, जिथे बाईकचे उदघाट्न झाले होते.आर३ (R3) आणि एमटी-०३ (MT-03) या स्पोर्ट्स बाईकचा पुरवठा यामाहा इंडिया वेबसाइटवर केलेल्या ऑनलाइन बुकिंगवर आधारित असेल. ऑनलाइन बुकिंगसाठी डीलरची यादी ३० नोव्हेंबर निश्चित केली जाईल. यानंतर लवकरच दोन्ही स्पोर्ट्स बाईकसाठी अधिकृत बुकिंग सुरू होईल, अशी अपेक्षा यामाहा कंपनीला आहे, असे सांगितले आहे. हेही वाचा…Royal Enfield ची उडाली झोप, होंडाची नवी बाईक देशात दाखल, बुकींगही सुरु, किंमत फक्त दोन्ही स्पोर्ट्स बाईकमधील वैशिष्ट्ये : दोन्ही स्पोर्ट्स बाइक्स ३२१सीसी (321cc) समांतर-ट्विन इंजिनद्वारे समर्थित आहेत. जे १०,७५० आरपीएम (10,750 RPM) वर ४२ बीएचपी (42 bhp) आणि ९,००० आरपीएम (9,000 RPM) वर २९.६ एनएम (29.6 Nm) जनरेट करते. ही मोटर ६ स्पीड (6-speed) गिअरबॉक्ससह जोडलेली आहे. बाईक डायमंड-प्रकारच्या फ्रेमने हायलाईट आहे, जी केवायबी KYB-सोर्स्ड अपसाइड-डाउन (KYB-sourced upside-down) फ्रंट फोर्क्सवर १३० मिमी (130 MM) ट्रॅव्हलसह आणि १२५ मिमी (125 MM) प्रवास करते. दोन्ही स्पोर्ट्स बाईकच्या किमती : आगामी आर३ (R3) आणि एमटी-०३ (MT-03) या दोन्ही मोटारसायकली पूर्णपणे बिल्ट युनिट्स सिबियूएस (CBUs) म्हणून आयात केल्या जातील. त्यामुळे सुरुवातीला आर३ (R3) ची किंमत तीन लाख रुपयां (3 lakh) पेक्षा जास्त असण्याची अपेक्षा आहे, तर एमटी-०३ (MT-03) ची किंमत सुमारे २०,००० (20,000) रुपयांनी कमी होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. बाकी कंपनीच्या बाईकना टक्कर : आगामी आर३ (R3) आणि एमटी-०३ (MT-03) या दोन्ही मोटारसायकली लाँच केल्यावर अनेक कंपन्यांच्या बाईकला टक्कर देईल, असे सांगण्यात येत आहे. तर डिसेंबरपर्यंत पॉवरफुल इंजिन आणि दमदार फिचर्ससह देशात यामाहाच्या या दोन हटके स्पोर्ट्स बाईक लाँच होणार आहेत.