श्रीनिवास बाळकृष्ण
मित्रांनो, पुराणातील कथेत आणि कार्टून फिल्ममध्ये वेगवेगळे आकाराचे जीव असतात. पृथ्वीवर तसे जीव कधीच नसतात. काही कार्टून कॅरेक्टर बनवताना अनेक मूळ आकाराची तोडफोड करावी लागते. कधीकधी जोडही द्यावी लागते. तुम्ही ‘ब्युटी अँड द बीस्ट’ हा सिनेमा पाहिलात का? हा अवतार बनवायला चित्रकाराला सात प्राण्यांच्या भागाचा वापर करावा लागला. हे काम करायला तसं फार कठीण आहे, पण आपण सोप्पं करून पाहूयात का? बोले तो युनिकोर्नसारखं. घोडय़ाला पक्ष्याचे पंख आणि गेंडय़ाचे शिंग जोडलेत.
मी तुम्हाला अशाच काही जोडय़ा देतो. १. हत्ती+गरुड, २.ऑक्टोपस + विंचू, ३. फुलपाखरू + मोर, ४. खेकडा + माकड.
तुम्ही मला अशा चित्र जोडय़ांचे
कार्टून करून पाठवा. यात तुम्ही तुमच्या मनाच्या जोडय़ाही घेऊ शकता. निवडक प्रयत्नांना आपण प्रसिद्धी देऊ.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
shriba29@gmail.com