अक्षय शिंपी हा धडपड्या तरुण गेली अनेक वर्षे अभिनय आणि साहित्य क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. कविता आणि अभिनय या दोहोंत वेगवेगळे प्रयोग करून पाहणारा अक्षय, लखनऊमधे दास्तानगोई या उर्दूमधील पारंपरिक कथाकथन प्रकारच्या संपर्कात आला आणि त्या प्रकाराने त्याला झपाटले. एकाच विषयाच्या धाग्यात विणलेले छोटे-छोटे किस्से, कथा, कविता असलेल्या आपल्या “दास्तान-ए-बड़ी बांका” या पहिल्या प्रयोगाद्वारे त्याने दास्तानगोई हा प्रकार मराठीत आणला. त्या प्रयोगाला जाणकार रसिकांची उत्तम दाद मिळत असतानाच आता तो, एकल कथा आणि तदनुषंगिक अभंगांचे मिश्रण असलेला “दास्तान -ए -रामजी” हा आपला नवा प्रयोग घेऊन प्रेक्षकांसमोर आलेला आहे.

सहा वर्ष एकाच व्यक्तीला डेट करत होती प्रियांका चोप्रा, निक जोनसला भेटली अन्…; स्वतःच खुलासा करत म्हणाली…

plot developer killed by chopping his private parts in nagpur over illicit affairs
खळबळजनक! विवाहित प्रियकराचा गुप्तांग ठेचून खून? अनैतिक संबंधाची किनार…
husband wife killed 6 injured in road accident
नागपूर : भीषण अपघातात पती-पत्नी ठार, ६ जखमी; कारची उभ्या ट्रॅक्टरला जबर धडक
Guru Gochar 2024
गुरु कृतिका नक्षत्रात करणार प्रवेश, या राशींच्या लोकांचा होईल भाग्योदय, धन-संपत्तीत होईल चांगली वाढ
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क

आपल्या प्रयोगाच्या प्रास्ताविकात अक्षय म्हणतो की, आपल्या जगण्यात कथांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कथा सांगणं-ऐकणं यावर आपला पिंड पोसला गेलाय. आई-आजींनी सांगितलेल्या धर्मग्रंथातील, पुराणातील, इतिहासातील गोष्टी ऐकत ऐकत आपण वाढलो. आपल्या आयुष्यात आलेल्या पहिल्या दास्तांगो (म्हणजे गोष्ट सांगणारी व्यक्ती) महिलाच होत्या. एखादी कथा रचणे आणि आपल्या अंतरंगीच्या रंगात रंगवून ती रंगवून सांगणे हे सृजनात्मक काम आहे. आपल्यासारखाच हाडामांसाचा एक जीव आपल्यातून निर्माण करणारी स्त्री ही सृजनशीलतेची स्वामीनी असल्याने, परंपरागत उर्दू दास्तांगोई मधे जरी स्त्रियांचा समावेश नसला तरी मराठीतल्या पहिल्या दोन्ही दास्तांगोईत स्त्रीचा आवर्जून समावेश करण्यात आलेला आहे.

प्रियांका चोप्राने ३०व्या वर्षी केलेले Eggs Freeze; आता खुलासा करत म्हणाली, “माझ्या आईने…”

“उपजें तें नाशें। नाशिलें पुनरपि दिसे। हे घटिकायंत्र तैसे। परिभ्रमे गा” अर्थात जन्म-मृत्यू या अटळ घटना. जे जन्म घेतं ते लयाला जाणार, हा सृष्टीनियम. या दोन टोकांत आयुष्याचा लंबक हलत रहातो. आपण जन्माचा सोहळा साजरा करतो आणि मृत्यूचे सुतक पाळतो. पण जन्म हीच केवळ सुरूवात नसते. मृत्यूही नव्या सृजनाच्या शक्यतेला जन्म देतोच. एक जीव जातो आणि एक जीव जन्माला येतो हे अविरत रहाटगाडगे चालूच राहते. मृत्यूमुळेच जगणं प्रवाही रहातं. हे अधोरेखित करणारी दि. बा. मोकाशी ह्यांची “आता आमोद सुनासि आले” ही कथा बऱ्यापैकी लोकप्रिय असल्याने ती आपण वाचलेली असते. ह्याच कथेवर सुमित्रा भावेंचा “दिठी” नावाचा मराठी सिनेमा दीड-दोन वर्षांपूर्वी आल्याने आपण ती कथा पडद्यावर पाहिलेलीही असते. तरीही दास्तांगो अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी जेव्हा ही दास्तानगोई आपल्या समोर सादर करतात तेव्हा आधी वाचलेली, पाहिलेली कथा अधिक जिवंत स्वरूपात आपल्याला उराउरी भेटते.

समोर केवळ एक पाण्याचे छोटे भांडे आणि दोन टाळ. बसायला एक छोटी पांढरी गादी. त्या गादीवर गुडघ्यावर बसलेले, पांढऱ्या लखनवी वेषातले अक्षय आणि नेहा हे दोन दास्तांगो आपल्या आवाजातील चढउतारातून, देहबोलीतून, बसण्याच्या बदलातून, लकबीतून, हावभावातून, ओढणीचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करून या कथेतील पात्रे आपल्या समोर जिवंत उभी करतात आणि तासभर आपल्याला खिळवून ठेवतात.

‘वेडात मराठे वीर दौडले सात’च्या सेटवर अपघात झालेल्या तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांचे गंभीर आरोप

बाहेर धो-धो कोसळणारा पाऊस, नदीला आलेला पूर, त्या पुराने रामजीच्या तरुण मुलाचा घेतलेला बळी, रामजीची अस्वस्थता, कोंदट माळ्यावर पोथीवाचनासाठी जमलेले रामजीचे सवंगडी, त्यांना रामजीबद्दल वाटणारी कळकळ, शिवाची अडलेली गाय, तिची घालमेल, शिवा आणि त्याच्या पत्नीची तगमग, शिवाच्या बायकोने रामजीला मदतीसाठी घातलेली आर्त साद, आणि गायीला सोडवता-सोडवता, देहापासून सुरू होऊन देहातीत होतानाचा रामजीचा हा प्रवास, अक्षय आणि नेहा इतक्या प्रभावीपणे आपल्यासमोर मांडतात की, द्वैताकडून अद्वैतापर्यंतच्या या प्रवासात आपण प्रेक्षकही रामजीचे सहप्रवासी बनतो. आपल्याही मनात मृत्यूची अपरिहार्यता ठसत जाते, आपलेही डोळे पाणावू लागतात.

“दास्तान-ए-बड़ी बांका” प्रमाणेच “दास्तान -ए -रामजी” मधे देखील एक तासभर हे दोन दास्तांगो स्टेजवरील एका गादीवर बसून त्या मर्यादित अवकाशात आपल्या कायिक आणि वाचिक अभिनयाने विविध व्यक्तिरेखा, विविध भावभावना आपल्या समोर जिवंत करून आपल्याला मंत्रमुग्ध करतात. जिथे जमेल तिथे जाऊन पहावा किंवा निवडक मित्रमंडळींसाठी आपल्या घरीच आयोजित करता येईल असा हा एक समृद्ध करणारा अनुभव आहे.