Maharashtra June Bank Holidays 2025 List : काही दिवसांतच जून महिना सुरू होणार आहे. नवीन महिना सुरू होण्याआधी लोक सुट्यांचे नियोजन करतात. त्यात जूनपासून पावसाळा सुरू होतो. त्यामुळे अनेक जण ट्रिपचा प्लॅन करतात; तर काही जण आर्थिक नियोजनात गुंतलेले असतात, ज्यांना बँकेसंबंधित महत्त्वाची कामे करायची असतात. जर तुमचेही जून महिन्यात बँकेसंबंधित काही महत्त्वाचे काम असेल, तर ते लवकरात लवकर पूर्ण करा. कारण- जून महिन्यात देशभरातील बँका एकूण १२ दिवस बंद राहतील. त्यामध्ये राष्ट्रीय सुट्या, प्रादेशिक सण आणि दुसरा-चौथा शनिवार व रविवार या नेहमीच्या आठवड्याच्या सुट्यांचा समावेश असेल.

आरबीआय हॉलिडे कॅलेंडरनुसार, जून महिन्यात बँका कधी आणि कुठे बंद राहतील ते जाणून घेऊ…

जून महिन्यातील बँक सुट्यांची यादी ( June 2025 Bank Holiday List)

१) ६ जून २०२५

ईद-उल- अधा (बकरीद)निमित्त तिरुवनंतपुरम आणि कोचीमधील बँकांना सुट्टी असेल.

२) ७ जून २०२५

बकरीद (ईद-उज-जुहा)निमित्त आगरतळा, ऐझॉल, बेलापूर, बेंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदिगड, चेन्नई, डेहराडून, गुवाहाटी, हैदराबाद, आंध्र प्रदेश, तेलंगणा, इम्फाळ, जयपूर, कोलकाता, जम्मू, मुंबई, कोलकाता, कानपूर, नवी दिल्ली, पणजी, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, श्रीनगरमधील बँका बंद असतील.

३) ११ जून २०२५

संत गुरू कबीर जयंती, सागा दावानिमित्त गंगटोक व शिमला येथील बँका बंद राहतील.

४) ११ जून २०२५

संत गुरू रथयात्रा, कांग (रथयात्रा)निमित्त भुवनेश्वर आणि इम्फाळमध्ये बँकांना सुट्टी असेल.

५) ३० जून २०२५

रेमना नीनिमित्त मिझोराममध्ये बँका बंद राहतील. (दरवर्षी मिझोराम राज्यात ३० जून रोजी रेमना नी म्हणजेच शांतता दिन साजरा केला जातो.)

६) १४ व २७ जून २०२५

दुसरा आणि चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील.

६) जूनमध्ये ५ रविवार

त्याशिवाय जूनमध्ये तब्बल पाच रविवार असतील आणि त्यामुळे पाच रविवार बँका बंद राहतील.

बँकांच्या सुट्यांबाबत ‘ही’ गोष्ट लक्षात ठेवा

बँकांच्या सुट्यांची यादी सर्व राज्यांमध्ये सारखी नसते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नुसार, सर्व राज्यांसाठी सुट्यांची यादी वेगवेगळी असते. या सुट्यांची संपूर्ण यादी आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे, ज्यामध्ये राज्यांनुसार वेगवेगळे सण आणि सुट्यांची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑनलाईन बँकिंग राहणार सुरु

बँका बंद असल्या तरी ग्राहकांना कोणतीही अडचण येणार नाही. सुटीच्या दिवशीही लोक ऑनलाइन बँकिंगच्या मदतीने त्यांची सर्व कामे पूर्ण करू शकतात. आजकाल बँकेच्या बहुतेक सेवा ऑनलाइन उपलब्ध आहेत. त्यामुळे सुटीच्या दिवशीही तुम्ही घरी बसून बँकिंगची अनेक कामे पूर्ण करू शकता.