पुणे : आघाडीची सराफी पेढी असलेल्या चंदुकाका सराफ ज्वेल्सने दिवाळीच्या मूहूर्तावर ग्राहकांसाठी ‘ग्रँड फेस्टिव्ह’ योजना आणली आहे. दिवाळी म्हणजे परंपरेची आणि आधुनिकतेची नवी सुरुवात असते. दिव्यांच्या प्रकाशात जेव्हा घर सजते, तेव्हा दागिन्यांच्या प्रकाशात मनही सजते. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदीला विशेष महत्त्व आहे. यासाठी सुवर्णखरेदीच्या परंपरेला पुढे चालवण्यासाठी चंदुकाका सराफ ज्वेल्सने ग्राहकांसाठी सोने खरेदीवर आकर्षक योजना जाहीर केल्या आहेत.
तब्बल २०० वर्षांपासून सोन्याच्या शुद्धता आणि परंपरेचा वारसा जपणारे चंदुकाका सराफ ज्वेल्स ग्राहकांच्या विश्वासाचे प्रतीक आणि प्रत्येक उत्सवाचा खरा सोबती म्हणून आपली बांधिलकी जपली असल्याचे म्हटले आहे. दिवाळी हा केवळ प्रकाशाचा सण नाही, तर नाती, परंपरा आणिआठवणींना जपण्याचा क्षण आहे. म्हणूनच यंदाची दिवाळी चंदुकाका सराफ ज्वेल्ससोबत खास होणार असल्याचे चंदुकाका सराफ ज्वेल्स्च्या वतीने संचालक सिध्दार्थ शहा व आदित्य शहा म्हणाले.
या योजनेंतर्गत ग्राहकांना सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर थेट ४० टक्के सूट तर हिऱ्यांच्या दागिन्यांवर कोणतीही मजुरी आकारण्यात येणार नाही. तसेच ग्राहकांना २ बीएचके सदनिका जिंकण्याची सुवर्णसंधी असून जुन्या सोन्यावर २,००० एक्सचेंज बोनस प्रति १० ग्रॅम वर मिळणार आहे. ही योजना २६ ऑक्टोबर २०२५ सुरू राहणार आहे.
आधुनिक डिझाईन्स, पारंपरिक दागिने आणि गुणवत्तेची हमी जपत सोने, हिरे आणि चांदीचे नवे विशेष कलेक्शनच्या खरेदीचा आनंद ग्राहकांना मिळणार आहे. पुण्यातील रविवार पेठ, चिंचवड, भोसरी, सातारा रोड, कोथरूड, वाकड, चऱ्होली, बाणेर तसेच महाराष्ट्रातील सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर, वाई, नांदेड , छ.संभाजीनगर आणि कर्नाटकातील अथणी, गोकाक, बेळगावी व रबकवी या सर्वशाखांमध्ये या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन चंदुकाका सराफ ज्वेल्स्च्या वतीने करण्यात आले आहे.
पुण्यातील रविवार पेठ, चिंचवड, भोसरी, सातारा रोड, कोथरूड, वाकड, चऱ्होली, बाणेर तसेच महाराष्ट्रातील सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर, वाई, नांदेड , छ.संभाजीनगर आणि कर्नाटकातील अथणी, गोकाक, बेळगावी व रबकवी या सर्वशाखांमध्ये या योजनेचा लाभ घेता येईल.