सिस्टम देखभाल आणि अपग्रेडमुळे काही सेवा बंद राहतील, अशी माहिती एचडीएफसी बँकेच्या वतीने ग्राहकांना इमेलद्वारे देण्यात आली आहे. बँकेने आपल्या सेवा सुधारण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. एचडीएफसी बँकेने ग्राहकांना पाठवलेल्या मेलमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना चांगली बँकिंग सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहोत, असे लिहिले होते. आम्ही आमच्या सिस्टीमच्या देखभाल आणि अपग्रेडसाठी आमच्या काही सेवा तात्पुरत्या निलंबित करणार आहोत. या प्रणालीची देखभाल आणि सुधारणा करण्याचे काम पहाटे ३ ते सकाळी ६ या वेळेत केले जाणार आहे. यावेळी बँकिंग सेवा साधारणपणे कमी वापरल्या जातात, असंही एचडीएफसी बँकेनं सांगितलं आहे.

कोणत्या सेवा बंद राहतील?

बँकेने केलेल्या मेलनुसार, शिल्लक तपासणी (बॅलन्स चेक करणे), ठेव, निधी हस्तांतरण आणि इतर पेमेंटशी संबंधित सेवा १० जून आणि १८ जून रोजी बंद राहतील. बँकेने सिस्टम अपग्रेडसाठी ४ जून रोजी सकाळी ३ ते ६ दरम्यान बँकिंग सेवा बंद ठेवल्या होत्या. डाऊनटाइम कमी करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील, असंही बँकेकडून मेलमध्ये सांगण्यात आले आहे.

bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
mumbai metro marathi news, mumbai metro latest marathi news
मेट्रो १ आता लवकरच एमएमआरडीएच्या मालकीची, एमएमओपीएल विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली
bmrcl
मळलेले कपडे, तुटलेली शर्टाची बटणं पाहून तरुणाला मेट्रोतून प्रवास करण्यापासून रोखलं, बंगळुरू मेट्रोची असंवेदनशीलता
2 accused arrested for cheating in the name of buying and selling transactions in the speculation market navi Mumbai
नवी मुंबई: सट्टा बाजारात खरेदी विक्री व्यवहाराच्या नावाखाली फसवणूक करणारे २ आरोपी अटक

अशा प्रकारे एचडीएफसी बँकेचे ग्राहक व्हॉट्सअॅपवर बॅलन्स तपासू शकतात

सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या बँकेत नोंदणीकृत अधिकृत क्रमांकावरून बँकेच्या WhatsApp क्रमांक ७०७००२२२२२ वर Hi पाठवावे लागेल.
यानंतर ग्राहक आयडीचे शेवटचे चार क्रमांक टाकावे लागतील.
त्यानंतर SMS वर असलेल्या OTP द्वारे WhatsApp बँकिंगसाठी स्वतःची नोंदणी करा.
एकदा आपण नोंदणी केली, त्यानंतर Account Services, Credit Card Services वर क्लिक करा आणि Apply for Products and More Services.
यामधून तुम्हाला अकाऊंट सर्व्हिसेसचा पर्याय निवडावा लागेल, त्यानंतर तुम्हाला बॅलन्स इन्क्वायरी, अकाउंट स्टेटमेंट आणि लास्ट सेव्हन ट्रान्झॅक्शन्सचा पर्याय मिळेल. यापैकी बॅलन्स एन्क्वायरीवर क्लिक करून तुम्हाला तुमचा बॅलन्स कळेल.