Gold Silver Rate Today : येत्या काही दिवसांमध्ये दिवाळी येत आहे. त्यामुळे खरेदीकडे ग्राहकांची बाजारात गर्दी दिसून येत आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी धनयत्रोदशीला लोक मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करतात. त्यामुळे सोन्याची आतापासून बुकींग करायला लोकांनी सुरुवात केली आहे. सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी वाढल्याने सोन्याचे दर सुद्धा वाढताना दिसत आहे. शुक्रवारी भारतात सोन्याच्या किंमतीने विक्रमी उच्चांक गाठला. शुक्रवारी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ७७,९०० रुपये होता. ऐन सणासुदीच्या काळात सोन्याच्या वाढत्या भावामुळे आता ग्राहकांच्या खिशाला चटका बसणार आहे.

सोने चांदीचे दर (शुक्रवार – १८ ऑक्टोबर २०२४ )

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, शुक्रवारी २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ७१,४०८ रुपये होती तर २४ कॅरेटसाठी ७७,९०० रुपये होती. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ९५७ रुपये होती म्हणजेच चांदी ९०,९५० रुपये प्रति किलो होती

हेही वाचा : जागतिक बँकेची भारतावर स्तुतिसुमनं; अध्यक्ष म्हणाले, “इथपर्यंत पोहोचण्यासाठी भारतानं खूप प्रयत्न केल्याचं दिसतंय”!

आजचा सोन्याचा दर (शनिवार – १९ ऑक्टोबर २०२४ )

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज सोने चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नाही पण शुक्रवारच्या विक्रमी दरानेच सोने चांदी विकली जात आहे. ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती $२,७११.९९ प्रति औंसपर्यंत वाढल्या आहेत.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७१,२८० रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७७,७६० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७१,२८० रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७७,७६० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७१,२८० रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७७,७६० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७१,२८० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७७,७६० रुपये आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याच्या किंमती का वाढतात?

भारतात सोन्याचे भाव भरमसाठ वाढण्यामागे देशांतर्गत कारणांपेक्षा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या घडामोडी मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरू लागल्या आहेत. नुकतंच अमेरिकेच्या फेडरल बँकेने अर्थात सोप्या भाषेत तिथल्या रिझर्व्ह बँकेने व्याजदरांमध्ये ५० बेसिस पॉइंट (bps)ची कपात केली आहे. येत्या काही महिन्यांत आणखीही कपात केली जाईल, असा अंदाज आहे. एकीकडे अमेरिकेत हे घडत असताना तिकडे इस्रायल व हेझबोला यांच्यातला तणाव व रशिया-युक्रेन युद्ध या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सोन्याची मागणी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अनेक देशांच्या शिखर बँका सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करू लागल्या आहेत.

अमेरिकेतील व्याजदर कपातीमुळे डॉलरची किंमत घटली आहे. त्यामुळे पत सुधारण्यासाठी अनेक देशांमधील बँका सोन्याची खरेदी करू लागल्या आहेत. “सोनं आणि अमेरिकन डॉलर यांचं व्यस्त नातं आहे. जेव्हा डॉलरची किंमत घटते, तेव्हा लोक सोन्याची खरेदी जास्त करतात”, असं निरीक्षण गिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे कमॉडिटीज हेड हरिश व्ही यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं.

हेही वाचा : मुंबईत वाढत्या घरभाड्यांमुळे ‘ब्रेन-ड्रेन’ होतंय, लोक कमावतायत कमी आणि भाडी भरतायत जास्त!

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?

हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे. १ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.