न्यूयॉर्क : आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था असलेल्या गोल्डमन सॅक्सकडून येत्या आठवडय़ात ३,२०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात वित्तसंस्थेने ४,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे सूचित केले होते. त्यातुलनेत प्रत्यक्षात कमी कर्मचाऱ्यांना बाहरेचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असमाधानकारक कामगिरी असणाऱ्यांची निवड करून दरवर्षी १ ते ५ टक्के कर्मचाऱ्यांना कमी करण्याची योजना गोल्डमन सॅक्सने निश्चित केली आहे. यंदाची नोकरकपात मात्र वित्तसंस्थेतील एकूण कर्मचारी संख्येच्या ८ टक्क्यांच्या घरात जाणारी आहे. सरलेल्या वर्षांतील ऑक्टोबरअखेरीस गोल्डमन सॅक्सची कर्मचारी संख्या ४९,१०० होती. २०१९ च्या अखेरीस या वित्तसंस्थेने केलेल्या काही अधिग्रहणानंतर एकूण कर्मचारी संख्येत सुमारे ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

बड्या ‘टेक’ कंपन्या इतकी घाऊक कर्मचारी कपात करतात, हे लक्षण कशाचं?

‘कॉइनबेस’कडून कर्मचारी कपात

आभासी चलन बाजारमंच असलेल्या ‘कॉइनबेस’ने एकूण कर्मचारी क्षमतेच्या २० टक्के म्हणजेच सुमारे ९५० कर्मचारी कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर इतर अनेक प्रकल्पांनादेखील टाळे लावण्याबाबत कंपनीने योजना आखली आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये कंपन्यांनी १८ टक्के म्हणजेच सुमारे १,१०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी कर्मचारी कपात करण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता, असे कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी ब्रायन आर्मस्ट्राँग यांनी मंगळवारी सांगितले.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goldman sachs to lay off nearly 3200 employees zws
First published on: 11-01-2023 at 06:53 IST