Small Saving Schemes Rates: सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सरकारने नवीन वर्षात मोठं गिफ्ट दिलं आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीसाठी योजनेचे व्याजदर ८ टक्क्यांवरून ८.२ टक्के करण्यात आले आहेत. पण इतर लहान बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. विशेषत: सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPFचे गुंतवणूकदार पुन्हा एकदा निराश झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुकन्या समृद्धी योजनेचे व्याज दुसऱ्यांदा वाढले

वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीसाठी जानेवारी ते मार्च या कालावधीतील छोट्या बचत योजनांचे व्याजदरांचे पुनरावलोकन केले आहे आणि त्यांची घोषणा केली आहे. छोट्या बचत योजनांमध्ये फक्त सुकन्या समृद्धी योजनेचे व्याजदर बदलण्यात आले आहेत.

विशेषत: मुलींसाठी चालवल्या जाणाऱ्या मोदी सरकारच्या योजनेचा व्याजदर ८ टक्क्यांवरून ८.२ टक्के करण्यात आला आहे. याआधीही चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी सुकन्या समृद्धी योजनेचे व्याजदर ७.६ टक्क्यांवरून ८ टक्के करण्यात आले होते. म्हणजेच चालू आर्थिक वर्षात सरकारने या योजनेच्या व्याजदरात ०.६ टक्क्यांनी वाढ केली आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govt hikes rates on sukanya samriddhi scheme 3 year term deposits by up to 20 bps vrd
First published on: 29-12-2023 at 17:59 IST