काही निवडक कालावधीसाठी MCLR चे दर इंडसइंड बँक आणि RBL बँक या दोन खासगी क्षेत्रातील बँकांनी बदलले आहेत. इंडसइंड बँकेने MCLR ५ बेसिस पॉईंट्सवरून १० बेसिस पॉईंट्सपर्यंत वाढवला आहे. तसेच RBL बँकेकडून MCLR १० बेसिस पॉइंटने कमी करण्यात आला आहे. दोन्ही बँकांच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, MCLR दर आजपासून लागू झाले आहेत.

इंडसइंड बँक

IndusInd बँकेने ओव्हरनाइट MCLR दर तीन महिन्यांपर्यंत १० बेसिस पॉइंट्सने वाढवले ​​आहेत. तर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी बेंचमार्क दर ५ बेसिस पॉइंट्सने वाढवला आहे. बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या वाढीनंतर ओव्हरनाइट MCLR दर ९.३५ टक्के, एक महिन्याचा MCLR दर ९.४० टक्के, तीन महिन्यांचा MCLR दर ९.७० टक्के आणि सहा महिन्यांचा बेंचमार्क दर १० टक्के झाला आहे. एक वर्षाचा MCLR दर १०.२० टक्के, दोन आणि तीन वर्षांचा MCLR १०.२५ टक्के आणि १०.३० टक्क्यांवर गेला आहे.

हेही वाचाः EPFO: १ लाख पगारावर ४७ हजारांहून अधिक पेन्शन मिळणार; ‘या’ तारखेपर्यंत निर्णय घेण्याची संधी

आरबीएल बँक

RBL बँकेकडून MCLR मध्ये १० बेसिस पॉइंट्सची कपात करण्यात आली आहे. यानंतर ओव्हरनाइट MCLR दर ९.२५ टक्क्यांवरून ९.१५ टक्के, एक महिना आणि तीन महिन्यांचा MCLR दर ९.२० टक्के आणि ९.५० टक्क्यांवर आला आहे. सहा महिने आणि एक वर्षाचा MCLR दर ९.२० टक्के आणि १०.२० टक्क्यांवर गेला आहे.

हेही वाचाः टाटांच्या TCS मध्ये मोठा नोकरी घोटाळा; कमिशनमध्ये घेतले १०० कोटी, ४ अधिकारी निलंबित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

MCLR म्हणजे काय?

MCLR चे पूर्ण रूप म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट आहे. बँकेद्वारे ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे कर्ज देण्यासाठी बेंचमार्क दर म्हणून त्याचा वापर केला जातो. यामध्ये वाढ किंवा घट झाल्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या ईएमआयवर होतो.