आर्थिक क्षेत्रात केंद्रीय अर्थसंकल्प हा महत्त्वाचा ‘वळणबिंदू’असतो. अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे काही उद्योगांना नवसंजीवनी मिळून ते क्षेत्र, त्या क्षेत्रातील उद्योगधंदे राखेतील फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेतात तर काही क्षेत्रातील उद्योगधंद्यांची राखरांगोळी होते. याचा विस्तृत आढावा घेण्याअगोदर निर्देशांकाचा साप्ताहिक बंद जाणून घेऊ या.

शुक्रवारचा बंद भाव: सेन्सेक्स: ६०,६२१.७७ / निफ्टी: १८,०२७.६५

article about sahyadri sankalp society information
सर्वकार्येषु सर्वदा : पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याचा ‘संकल्प’
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
sarva karyeshu sarvada sane guruji rashtriy smarak trust information in marathi
सर्वकार्येषु सर्वदा : युवकांना घडवण्याचा उपक्रम, विस्तारासाठी मदत आवश्यक
Loksatta bookmark My Father Brain A Life in the Shadow of Alzheimer Sandeep Johar
बुकमार्क: विस्मृतीच्या अंधारातील धडपड…
Factory activity at three-month low Production PMI Index at 57.5 points in August
कारखानदारीचा वेग तीन महिन्यांच्या नीचांकाला, निर्मिती ‘पीएमआय निर्देशांक’ ऑगस्टमध्ये ५७.५ गुणांवर
mhada Reduce Consent Requirement of building owner for Group Redevelopment
समूह पुनर्विकासात इमारत मालकांच्या १०० टक्के संमतीला म्हाडाकडून आक्षेप, साडेआठशे इमारतींचा पुनर्विकास दृष्टिपथात!
tanishq and de beers collaboration to boost India s natural diamond jewellery market
डी बीयर्सशी भागीदारीतून हिऱ्यांच्या ग्राहकांमध्ये दुपटीने वाढीचे तनिष्कचे लक्ष्य
low cost and small cars are necessary in India says maruti suzuki chief rc bhargava
कमी किमतीच्या छोट्या मोटारी देशासाठी आवश्यकच!; मारुती सुझुकीचे अध्यक्ष भार्गव यांचे प्रतिपादन

गेल्या लेखातील ‘चाफा बोलेना’मधील निफ्टी निर्देशांकाच्या भविष्यकालीन वाटचालीबद्दल भाष्य होते – ‘आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकावर १८,३०० च्या स्तराला ‘अनन्यसाधारण’ महत्त्व असणार आहे. निफ्टी निर्देशांक १८,३०० च्या स्तरावर पंधरा दिवस सातत्याने टिकल्यास बाजार या मंदीच्या गर्तेतेतून बाहेर पडला, असे गृहीत धरावे, अन्यथा निफ्टी निर्देशांक क्षीण स्वरूपातील सुधारणेत १८,००० ते १८,१५० चा स्तर पार करण्यास अपयशी ठरल्यास निफ्टी निर्देशांकावर फिरून मंदीचे आवर्तन सुरू होऊन निफ्टी निर्देशांकाचे प्रथम खालचे लक्ष्य १७,७०० असेल…’ काळाच्या कसोटीवर वरील वाक्य तपासता ८ ते २० जानेवारी या दरम्यान, निफ्टी निर्देशांकाने १२ जानेवारीला १७,७६१ चा नीचांक नोंदवत १८ जानेवारीला दिवसांतर्गत १८,१८३ चा उच्चांक नोंदवला. तर, २० जानेवारीचा साप्ताहिक बंद १८,०२७ या पातळीवर नोंदवत, अगोदर नमूद केलेल्या १७,७०० ते १८,१५० च्या परिघातच निफ्टी निर्देशांकाची गेल्या पंधरा दिवसांतील वाटचाल होती.

अर्थसंकल्प हा महत्त्वाचा ‘वळणबिंदू’ असल्याने १ फेब्रुवारीला सादर होणारा अर्थसंकल्प बाजाराच्या पसंतीस उतरल्यास निफ्टी निर्देशांकाच्या तेजीच्या भरारीचे वरचे लक्ष्य अथवा सादर झालेला अर्थसंकल्पाकडून बाजाराचा दारुण अपेक्षाभंग झाल्यास निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य काय असेल, त्याचा आढावा आजच्या लेखात घेऊ या.

आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकावर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर हा १८,३०० ते १८,६०० असेल. १ फेब्रुवारीला सादर झालेला अर्थसंकल्प बाजाराच्या पसंतीस उतरल्यास आणि निफ्टी निर्देशांक सातत्याने १८,६००च्या स्तरावर पंधरा दिवस टिकल्यास निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य १८,९००…, १९,२००…, १९,५०० असे ३०० अंशांचा परीघ (बँण्ड) तयार विस्तारत नेणारे असेल. निफ्टी निर्देशांकाचे दीर्घ मुदतीचे वरचे लक्ष्य २०,५०० असेल.

सादर झालेल्या अर्थसंकल्पाकडून बाजाराचा दारुण अपेक्षाभंग झाल्यास निफ्टी निर्देशांक १८,३०० च्या महत्त्वाच्या केंद्रबिंदू स्तराखाली राहत निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य १८,०००…, १७,७००…, १७,४०० असे घसरण दर्शविणारे असेल. निफ्टी निर्देशांकाचे दीर्घ मुदतीचे खालचे लक्ष्य १६,२०० ते १५,८०० असेल.

यंदाचा अर्थसंकल्प सुख/ दु:ख देण्यापेक्षा, सुखाची आशा लावणारा…

शिंपल्यातील मोती : झेन्सार टेक्नॉलॉजी लिमिटेड

(शुक्रवार दि.२० जानेवारीचा बंद भाव रु.२१८.४०)

संगणक, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील परवलीचा शब्द म्हणजे ‘बीएफएसआय’ अर्थात बँक,फायनान्शियल्स, इन्श्युरन्स तसेच उच्च अभियांत्रिकी क्षेत्रात, अमेरिका, युरोप, दक्षिण आफ्रिका या खंडामध्ये कार्यरत असलेली ही ‘आरपीजी’ उद्योग समूहाची आघाडीची कंपनी. सप्टेंबर २०२२ तिमाहीसाठी जाहीर झालेल्या निकालात कंपनीचे उत्पन्न हे १५५ दशलक्ष डॉलर असून, तो १४.४ टक्क्यांचा वार्षिक वृद्धीदर दर्शवत आहे. तर आर्थिक ताळेबंदात कंपनीकडे १६२.१ दशलक्ष डॉलरची रोकड तरलता आहे.

हे आर्थिक निकष समभागाच्या भांडवली बाजाराच्या वाटचालीत परावर्तीत केल्यास २०० रुपये हा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’असून, येणाऱ्या दिवसांत समभागाने २०० रुपयांचा स्तर राखल्यास समभागाचे अल्पमुदतीचे वरचे लक्ष्य अनुक्रमे २२५ रुपये, २५० रुपये ते ३०० रुपये असेल. तर दीर्घमुदतीचे वरचे लक्ष्य ४०० रुपये असेल. झेन्सार टेक्नॉलॉजीचा तिमाही वित्तीय निकाल आज (२३ जानेवारीला) असल्याने आपण वळणबिंदूवर (टर्निंग पाॅइंटवर) आहोत तेव्हा प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्यानंतर समभागाने बाजारात २०० रुपयांचा किंमत स्तर राखणे नितांत गरजेचे आहे. तरच समभागाच्या खरेदीचा विचार करावा. अन्यथा १७५ ते १५० रुपयांपर्यंच्या घसरणीत समभागाचा विचार करावा. झेन्सार टेक्नॉलॉजीच्या गुंतवणुकीला १४० रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

महत्त्वाची सूचना : वरील समभागात लेखकाची स्वतःची अथवा जवळच्या नातेवाईकांची गुंतवणूक नाही. वरील समभागाचा तटस्थ दृष्टीने परीक्षण करून ते वाचकांसाठी सादर केलेले आहे.

शिंपल्यातील मोती या सदराचा उद्देश दीर्घमुदतीत संपत्ती निर्माण करणे हा आहे. त्यामुळे या सदरात समभागाची शिफारस झाल्यावर तो समभाग तातडीने न घेता, तो मंदीमध्ये पडेल भावात खरेदी करावा हा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे हा समभाग मंदीत खाली किती येऊ शकतो त्याची कल्पना वाचकांना त्या लेखातच दिल्याने वाचकांची आर्थिक व मानसिक तयारी होते. जसे की या सदरातील ७ नोव्हेंबरच्या लेखात ‘आनंद राठी वेल्थ लिमिटेड’ हा समभाग ७१२ रुपयाला होता. पण मंदीत हा समभाग ६७० ते ६३५ रुपयांपर्यंत घसरू शकतो तेव्हा तो खरेदी करावा, असे त्या लेखात नमूद केले होते. झाले ही तसेच २३ डिसेंबरला आनंद राठी वेल्थने ६५५ रुपयांचा नीचांक नोंदवला. नंतर मात्र समभागाच्या किमतीत सुधारणा सुरू झाली व ही सुधारणा इतकी नेत्रदीपक होती की समभागाची भांडवली बाजारातील किंमत ऐतिहासिक उच्चांकावर झेपावली. या मंदीच्या दिवसांत, अशी कामगिरी खरे तर अविश्वसनीयच! आनंद राठी वेल्थ लिमिटेडने २० जानेवारीला ८५४ रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक गाठत त्या दिवशीचा बंद भाव ८४४ रुपये नोंदवला. अशी ही मुलखावेगळी, रक्तदाब न वाढवता निवृत्तीनंतरच्या पर्यायी उत्पन्नाची तरतूद वाचक कशी करू शकतात त्याचे हे उत्तम उदाहरणच!

Budget 2023 : निर्मला सीतारामन १ फेब्रवारीला अर्थसंकल्प मांडणार; ३१ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

निकालपूर्व विश्लेषण

१) ॲक्सिस बँक

तिमाही वित्तीय निकाल- सोमवार, २३ जानेवारी

२०जानेवारीचा बंद भाव- ९३०.५५रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- ९१५रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ९१५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ९७० रुपये, द्वितीय लक्ष्य ८२०रुपये.

ब) निराशादायक निकाल: ९१५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ८८० रुपयांपर्यंत घसरण.

२) मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल- मंगळवार,२४ जानेवारी

२० जानेवारीचा बंद भाव- ८,४३९.८० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- ८,४५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ८,४५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ८,६५० रुपये, द्वितीय लक्ष्य ८,८०० रुपये.

ब) निराशादायक निकाल: ८,४५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ८,०५० रुपयांपर्यंत घसरण.

३) टाटा मोटर्स लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल- बुधवार, २५ जानेवारी

२० जानेवारीचा बंद भाव- ४०३.१५ रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- ४१५रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ४१५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४२५ रुपये,द्वितीय लक्ष्य ४५० रुपये.

ब) निराशादायक निकाल:४१५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३८० रुपयांपर्यंत घसरण.

४) टाटा स्टील लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल- सोमवार,६ फेब्रुवारी

२० जानेवारीचा बंद भाव- १२२.९५रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- ११०रु.

अ)उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ११० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १३० रुपये, द्वितीय लक्ष्य १५० रुपये.

ब) निराशादायक निकाल: ११० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ९५ रुपयांपर्यंत घसरण.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि ‘इच्छित लक्ष्य’ (टार्गेट प्राइस) या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.