How to Apply for a PAN Card : पॅन कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी त्यांच्या नागरिकत्वाचा पुरावा म्हणून आणि त्यांच्या कर संबंधी कामासाठी खूप महत्त्वाचा दस्तावेज आहे. भारतीय आयकर विभागाने गेल्या काही दिवसात पॅन कार्डसाठी अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी केली आहे. इंटरनेट उपलब्ध असणारा कोणताही व्यक्ती अगदी सोप्या पद्धतीने यासाठी अर्ज करू शकतो.
आयकर विभागाने पॅन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचे काम हे एनएसडीएल (NSDL)कडे दिले आहे. याशिवाय यूटीआय इन्फ्रास्ट्रक्चर अँड सर्व्हिसेस लिमिटेड (UTIISL)ची देखील ऑनलाईन अर्जासाठी आयटी विभागाकडून नेमणूक केली गेली आहे. जिल्हा पातळीवर देखील अनेक एजन्सी यासाठी काम करतात, ज्यांच्याकडून पॅनसाठी अर्ज स्वीकारले जातात, त्यावर प्रोसेस केली जाते आणि त्यानंतर ग्राहकाला कार्ड दिले जाते.
पॅन कार्डसाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने देखील अर्ज केला जाऊ शकतो. ऑनलाईन पद्धतीने पॅन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही प्रोटीन ईगव्ह टेक्नॉलॉजीज लिमिटेड (पूर्वीचे एनएसडीएल)च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता आणि आवश्यक असलेला तपशील भरू शकता. तसेच तुम्ही UTIIISLच्या वेबसाईटवर देखील हा अर्ज करू शकता. तर पॅन कार्डसाठीचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरण्यासाठी तुम्हाला हा अर्ज डाऊनलोड करून घ्यावा लागेल आणि त्यानंतर तो भरून तुमच्या सोयीच्या एजन्सीकडे तो तुम्ही भरू शकता.
पॅनकार्डसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा कराल?
पुढील स्टेप्स फॉलो करून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने पॅन कार्डसाठी अर्ज करू शकता.
स्टेप १ – पॅन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हीला पहिल्यांदा तुम्हाला प्रोटीन ईगव्ह टेक्नॉलॉजीज लिमिटेड (Protean eGov Technologies Limited) पूर्वीचे NSDLच्या वेबसाईटवर जावे लागेल आणि येथे तुम्हाला तुमचा अर्ज भरता येईल.
स्टेप २ – ही वेबसाईट उघडल्यानंतर त्यावर डाव्या कोपऱ्यात ‘अप्लाय ऑनलाईन’ दिसेल त्यावर क्लिक करा.
त्याच्या खाली तुम्हाला तीन पर्याय दिसतील ज्यापैकी एक तुम्हाला निवडायचा आहे.
नवीन पॅन – भारतीय नागरिक
नवीन पॅन – परदेशी नागरिक
पॅन कार्ड रि-प्रिंट/असलेल्या पॅनमध्ये बदल किंवा दुरूस्ती
स्टेप ३ – हे केल्यानंतर तुम्हाला ‘कॅटेगरी’ निवडावी लागेल. कॅटेगरीच्या यादीमध्ये तुम्हाला वैयक्तिक, कंपनी, व्यक्तींचा सहकारी (an associate of individuals), हिंदू अविभक्त कुटुंब, ट्रस्ट, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप (Limited Liability Partnership), स्थानिक प्रशासन असे पर्याय दिसतील.
स्टेप ४ – वर दिलेल्यापैकी कोणताही एक पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा तपशील त्यामध्ये भरावा लागेल.
या खालील सेक्शनमध्ये माहिती भरावी लागेल
- शीर्षक (Title)
- आडनाव
- तुमचं नाव
- जन्म तारीख
- ईमेल आयडी
- फोन क्रमांक
स्टेप ५ – आवश्यक असलेली माहिती तुम्ही भरली की तुम्हाला कॅप्चा कोड टाईप करावा लागेल आणि त्यानंतर ‘सबमिट’ वर क्लिक करावे लागेल.
स्टेप ६ – अर्ज सबमिट केल्यानंतर वेबसाईटवर तुम्हाला १५-अंकी पोचपावती क्रमांक दिला जाईल, यानंतर तुम्ही या पेजचे प्रिंट काढून घेतली तर ते तुमच्यासाठी भविष्यात उपयोगी ठरू शकते.
पॅन कार्डसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत
पुढील काही सोप्या पायऱ्या फॉलो करून तुम्ही पॅन कार्डसाठी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
स्टेप १ – तुम्हाला भारतीय आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरून फॉर्म ४९अ डाउनलोड करावा लागेल किंवा यासाठी तुम्ही UTIISL द्वारे चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही आयकर पॅन सेवा केंद्राला भेट देऊ शकता.
स्टेप २ – ८ पानांच्या या अर्जात विचारण्यात आलेली सर्व माहिती व्यवस्थित भरा.
स्टेप ३ – हा अर्ज पूर्णपणे भरला की या अर्जाबरोबर करासह एक १०७ रूपयांच्या डिमांड ड्राफ्ट पाठवावा लागेल.
स्टेप ४ – जर पॅन भारताबाहेर पाठवावे लागणार असेल तर तुम्हाला ८८७ रुपये जास्त मोजावे लागतात.
स्टेप ५ – पॅन कार्डसाठीच्या अर्जाबरोबर तुम्हाला ओळखीचा पुरावा आणि तुमच्या पत्त्याचा पुरावा पाठवावा लागेल. तुम्हाला अर्ज – इन्कम टॅक्स पॅन सर्व्हिस युनिट (मॅनेज्ड बाय प्रोटीन ईगव्ह टेक्नॉलॉजीज लिमिटेड ई-गव्हर्नन्स, इफ्रास्ट्रक्चर लिमिटेड), ५वा मजला, मंत्री स्टर्लिंग, प्लॉट क्रमांक ३४१, सर्व्हे क्रमांक ९९७/8, मॉडेल कॉलनी, दीप बंगला चौकाजवळ, पुणे – ४११ ०१६, या पत्त्यावर पाठवावा लागेल.
पॅन कार्ड हरवले असेल तर पुन्हा अर्ज करण्याची प्रक्रिया काय असते?
जर तुमचे पॅन कार्ड हरवले असेल तर तुम्ही ते परत मिळवण्यासाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला प्रोटीन ईगव्ह टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. येथे मुख्य पानावर गेलात की तुम्हाला येथे ‘रिप्रिंट ऑफ पॅन कार्ड’ हा पर्याय निवडावा लागेल. महत्त्वाचे म्हणजे, हा पर्याय या आधी तुम्हाला पॅन कार्ड आणि क्रमांक देण्यात आलेला असेल आणि तुम्ही त्याची मूळ कॉपी हरवली असेल तर वापरू शकता.
यासाठी अर्ज करण्यासाठी पुढील प्रक्रिया करावी लागेल –
स्टेप १ – पहिल्यांदा प्रोटीन ईगव्ह टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या वेबसाईटला भेट द्या.
स्टेप २ – यानंतर ‘रिप्रिंट ऑफ पॅन कार्ड’ या पर्यायामध्ये देण्यात आलेल्या ‘अप्लाय नाऊ’ या पर्यायावर क्लिक करा.
स्टेप ३ – तुम्ही दोन पर्याय निवडू शकता एक ‘अप्लाय नाऊ’ किंवा दुसरा ‘रजिस्टर यूजर’.
स्टेप ४ – जर तुम्ही रजिस्ट यूजर असाल तर तुम्हाला एक टेम्पररी टोकन क्रमांक टाकावा लागेल, याबरोबरच ई-मेल आयडी, फोन क्रमांक, जन्म तारीख आणि कॅप्चा कोड टाकून ‘सबमिट’ वर क्लिक करावे लागेल.
स्टेप ५ – ‘अप्लाय ऑनलाईन’ पर्याय क्लिक केला तर तुम्हाला तुमची सर्व माहिती जसे की तुमचे नाव, आडनाव, अर्जाचा प्रकार आणि कॅटेगरी, फोन क्रमांक, जन्म तारीख आणि ईमेल देखील भरावा लागेल.
स्टेप ६ – एकदा हे पूर्ण केले की त्यामध्ये कॅप्चा कोड भरा आणि ‘सबमिट’ वर क्लिक करा.
स्टेप ७ – यानंतर तुम्हाला एक टोकन क्रमांक दिला जाईल जो पुढील संदर्भांसाठी तुम्हाला सांभाळून ठेवावा लागेल.
स्टेप ८ – त्यानंतर तुम्ही तुमचे पॅन कार्ड ऑनलाईन रिप्रिंट करण्यासाठी त्याच पेजवरून अर्ज करू शकता यासाठी तुम्हाला आवश्यक तपशील द्यावा लागेल.
स्टेप ९ – तुमचे पॅन कार्ड एकतर तुम्ही दिलेल्या ईमेलवर पाठवले जाईल किंवा तुम्हाला त्याची प्रत तुमच्या पत्त्यावर पोस्टाने पाठवली जाईल, यापैकी कोणताही पर्याय तुम्ही वापरू शकता.
भारतीय आणि परदेशी नागरिकांसाठी पॅन कार्ड अर्ज करण्याची पद्धत काय असते?
भारतीय नागरीक तसेच परदेशी नागरिक नवीन पॅन कार्डसाठी किंवा आधीच असलेले पॅन कार्ड रिप्रिंट करण्यासाठी तुम्ही एनएसडीएलच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. येते तुम्हाला अर्ज भरावा लागेल.
पॅन कार्डसाठी कोण अर्ज करू शकतं?
नवीन पॅन कार्डसाठी किंवा पॅन कार्डमध्ये कुठलीही दुरूस्ती करण्यासाठीची विनंती कोणताही व्यक्ती, ट्रस्ट, कॉर्पोरेट कंपन्या, संस्था, स्थानिक प्रशासन, अल्पवयीन, ज्येष्ठ नागरिक तसेच सरकारे देखील अर्ज करू शकतात.
देशातील प्रत्येक करदात्याकडे कर श्रेणीतील पगार स्वीकारणे, म्युच्युअल फंड खरेदी करणे किंवा त्यात गुंतवणूक करणे यासारखे कोणतेही आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड असणे आवश्यक आहे . तुमच्या पॅन कार्डच्या मदतीने सर्व आर्थिक व्यवहार ट्रॅक केले जातात आणि आयकर विभाग त्यांचा हिशेब ठेवते.
पॅन कार्डसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात?
नवीन पॅनकार्ड काढण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे आवश्यक असतात.
- आधार कार्ड
- पासपोर्ट
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- स्वीकृती पत्र (जर तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर)
पॅन कार्ड अर्जासाठी शुल्क किती लागतं?
आयकर विभागाकडे तुम्ही दाखल केलेल्या अर्जाच्या प्रकारानुसार शुल्क बदलते. जसे की, नवीन पॅन कार्डच्या अर्जासाठी, ऑनलाइन अर्ज करताना डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात १०७ रुपये शुल्क भरावे लागते. हे भारतीय नागरिकांसाठी आहे.
कार्डसाठी तुम्ही कोणत्या प्रकारचा अर्ज केला आहे यानुसार जर तुम्ही भारतीय किंवा परदेशी नागरिक असाल किंवा तुम्ही बदल करण्यासाठी अर्ज केला असेल तर तुमच्याकडून आकारले जाणारे शुल्क वेगळे असू शकते. जर तुम्ही तुमच्या पत्त्यावर कार्ड मिळवे यासाठीचा पर्याय निवडला असेल तर पोस्टल शुल्क देखील आकारले जाते.