अनेक जन नोकरीच्या शोधात आहेत. त्यांच्यासाठी येत्या काही दिवसांत अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनमध्ये ५५ हजार पदांसाठी भरती होणार आहे. तसेच अन्य ठिकाणीही नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. या भरती संदर्भातील अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत.

DRDO मध्ये नोकरीची संधी

DRDO अर्थात ‘डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’ने बेंगळुरू येथे काही पदांसाठीची भरती जाहीर केली आहे. सेंटर ऑफ आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड रोबोटिक्समध्ये ज्युनिअर रिसर्च फेलो या पदाची जागा रिक्त आहे. या पदासाठी १८ आणि १९ ऑक्टोबर २०२१ तारखेला वॉक इन पद्धतीने मुलाखत होणार आहे. उमेदवारांची सुरवातीला २ वर्षांसाठी नेमणूक केली जाईल.

सिक्कीम लोकसेवा आयोग

SPSC अर्थात सिक्कीम लोकसेवा आयोगाने www. spscskm.gov.in या आपल्या अधिकृत संकेतस्थळावर भरतची अधिसूचना जारी केली आहे. यात मत्स्य ब्लॉक अधिकारी पदासाठी ११ तर मत्स्य रक्षक पदासाठी 13 जागा रिक्त आहेत. पात्र उमेदवार १५ सप्टेंबर २०१२ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

अॅमेझॉनमध्ये भरती

ऑनलाईन रिटेल जायंट अॅमेझॉनने जाहीर केले आहे की ते भारतात १६ आणि १७ सप्टेंबर रोजी पहिल्यांदाच करिअर डे आयोजित करणार आहे. दोन दिवसांमध्ये अॅमेझॉनने भरती करणाऱ्यांसोबतच वन ऑन वन विनामूल्य करिअर कोचिंग सत्रही आयोजित केले आहे. अॅमेझॉनने हे देखील जाहीर केले आहे की ते सध्या देशातील ३५ शहरांमध्ये ८,००० पेक्षा जास्त थेट नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत.

नॅशनल हायड्रॉलिक पॉवर कार्पोरेशन भरती

NHPC मध्ये एकूण १७३ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यात सीनियर मेडिकल ऑफिसर, ज्युनिअर इंजिनिअर, असिस्टंट राजभाषा अधिकारी या पदांसाठी भरती होणारा आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून nhpcindia.com या संकेतस्थळावर ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात.