महानगरपालिका क्षेत्रात व्यवसाय करताना व्यवसाय अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे व्यवसाय परवाना होय. कोणत्याही व्यवसायाची कायदेशीर सुरुवात या परवान्याने होते. दुकानाच्या नावाने बँकेत खाते उघडण्यासाठी व व्यावसायिक कर्ज प्रकरणे करण्यासाठी हा परवाना महत्त्वाचा दाखला ठरतो.

परवान्याचे महत्त्व

  • व्यावसायिकाला विविध शासकीय व खाजगी टेंडर / निविदा भरते वेळी व्यवसायच अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र गरजेचे असते.
  • त्याचप्रमाणे विविध कंपनीच्या तालुका स्तरावरील एजन्सीज मिळविण्यासाठी व्यवसाय दाखला व कमर्शिअल गाळे, दुकानाचा विमा इ.सेवांचा लाभ घेण्यासाठी व्यवसाय परावाना महत्त्वाचा ठरतो.
  • सदर परवानाधारकांनाच मूल्यवर्धित कर नंबर काढता येतो. ग्रामपंचायत क्षेत्रात शॉप अधिनियमाची आवश्यकता नसते, परंतु गावाची लोकसंख्या १० हजारपेक्षा जास्त असल्यास शॉप अधिनियम लागते.

आवश्यक कागदपत्रे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • जेथे व्यवसाय सुरू आहे किंवा करावयाचा आहे. त्या ठिकाणचे / जागेवरील घेतलेले वीजदेयक/ भ्रमणध्वनी देयक
  • जागा स्व-मालकीची असले तर जागेचा उतारा.
  • जागा भाडेतत्त्वावर असल्यास १०० रुपये स्टॅम्पवर मालकाचे संमतीपत्र, वीजदेयक, भ्रमणध्वनी देयक नसल्यास संमतीपत्रात जागेचे ठिकाण पूर्ण नोंदवावे.
  • दोन फोटो, अर्जदाराचे कूपन झेरॉक्स
  • पॅन कार्ड झेरॉक्स

प्रक्रिया

  • उपरोक्त कागदपत्रांची पूर्तता करून कामगार सहायक आयुक्त यांच्याकडे प्रस्तावयोग्य चलन व फी जमा करून सादर करावा.
  • प्रस्ताव बिनचूक असल्यास किमान नऊ दिवसात व्यवसाय परवाना प्राप्त होतो.
  • सदर दाखला हा दुकानाच्या दर्शनी भागात दिसेल अशा ठिकाणी लावावा.
  • व्यवसाय परवाना हा दर वर्षी १५ डिसेंबर पूर्वी नूतनीकरण करणे आवश्यक असते.
  • नूतनीकरण करताना मूळ परवाना जवळ असावा. या परवान्यावर सुट्टीचा दिवसाचा उल्लेख केलेला असतो. हा सुट्टीचा दिवस देणे व्यावसायिकावर बंधनकारक असते.
  • आठवडय़ातील सुट्टीचा दिवस ठरविण्याचा अधिकार व्यावसायिकाला असतो.