भारतीय नौदलात खेळाडूंसाठी विविध संधी-

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत व त्यांनी विविध क्रीडा प्रकारांत विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी.

वयोमर्यादा २२ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली नौदलाची खेळाडूंसाठीची जाहिरात पाहावी अथवा नौदलाच्या www.indiannavy.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज दि सेक्रेटरी, इंडियन नेव्ही स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड, ७ वा मजला, चाणक्य भवन, इंटिग्रेटेड हेडक्वार्टर्स, एमओडी (नेव्ही), नवी दिल्ली- ११००२१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०१८.

सीरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस, नवी दिल्ली येथे खासगी सचिवांच्या ८ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १८ ते २४ नोव्हेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली सीरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस, नवी दिल्लीची जाहिरात पाहावी अथवा विभागाच्या http://sfio.nic.in/ अथवा http://www.mca.gov.in/ या संकेतस्थळांना भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर, सीरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस, दुसरा मजला, पं. दीनदयाळ अंत्योदय भवन, बी-३ विंग, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली- ११०००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०१८.

नौदल गोदी – मुंबई येथे डेटा एन्ट्री ऑपरेटरच्या १४ जागा-

अर्जदार बारावी उत्तीर्ण असावेत व त्यांना संगणकाचे अद्ययावत ज्ञान असायला हवे. वयोमर्यादा २५ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २३ ते २९ डिसेंबर २०१७ च्या अंकातील नौदल मुंबईची जाहिरात पाहावी अथवा नौदलाच्या  http://www.bhartiseva.com/ अथवा www.indiannavy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जानेवारी २०१८.

संरक्षण मंत्रालयाच्या जबलपूर येथील रुग्णालयात वॉर्ड साहाय्यिकांच्या १० जागा-

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्जदार महिला शालान्त परीक्षा उत्तीर्ण असाव्यात व त्यांना दाईविषयक कामाचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २३ ते २९ डिसेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली संरक्षण मंत्रालय, जबलपूरची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज दि कमांडंट, मिलिटरी हॉस्पिटल, जबलपूर (म.प्र.) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १४ जानेवारी २०१८