आर्मी बेस वर्कशॉप, खडकी, पुणे येथे कनिष्ठ कारकुनांच्या २ जागा-

अर्जदार बारावी उत्तीर्ण व इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनिट तर हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट पात्रता पूर्ण केलेले असावेत. संगणकाचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली आर्मी बेस वर्कशॉपची जाहिरात पहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज दि कमांडंट अ‍ॅण्ड एमडी, ५१२ आर्मी बेस वर्कशॉप, खडकी, पुणे- ४११००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १३ जानेवारी २०१७.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये सीनिअर इंजिनीअर्सच्या २१ जागा-

उमेदवारांनी मेकॅनिकल वा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी गेट- २०१५ अथवा २०१६ ही पात्रता परीक्षा दिलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे. अधिक माहितीसाठी माझगाव डॉक, मुंबईची एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३१ डिसेंबर २०१६ – जानेवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली जाहिरात पाहावी अथवा माझगाव डॉकच्या http://www.mazdock.com, online Recruitment  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जानेवारी २०१७.

केंद्रीय विधी सेवा विभागात विधीतज्ज्ञांच्या ६ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २४ ते ३० डिसेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in अथवा http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जानेवारी २०१७.

नौदलात बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी :

अर्जदारांनी १० वी व बारावीच्या परीक्षेत इंग्रजीमध्ये कमीतकमी ५०% गुण मिळविलेले असावेत व बारावीची परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित हे विषय घेऊन व कमीतकमी ७०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा १९.५ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १७ ते २३ डिसेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली नौदलाची जाहिरात पहावी अथवा नौदलाच्या http://www.joinindiannavy.gov.in   या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जानेवारी २०१७.

मिनरल एक्स्पोरेशन कॉर्पोरेशन, नागपूर अंतर्गत टेक्निशियन (ड्रिलिंग)च्या ४० जागा-

वयोमर्यादा ३० वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १० ते १६ डिसेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली मिनरल एक्स्पोरेशन कॉर्पोरेशनची जाहिराता पहावी अथवाwww.mecl.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जानेवारी २०१७.

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये शिकाऊ उमेदवारांना संधी-

अर्जदार मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग अथवा प्रोग्रॅमिंग अ‍ॅण्ड सिस्टिम अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमधील पदवीधर अथवा पदविकाधारक असावेत. अधिक माहिती व तपशिलासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या http://www.mumbaiport.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जानेवारी २०१७.

बॉटनिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियामध्ये पुण्यासह विविध ठिकाणी ज्युनिअर प्रोजेक्ट फेलोच्या २० जागा-

वयोमर्यादा ३० वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी बॉटनिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियाच्या http://bsi.gov.in/Center/194_7_WesternRegionalCentrePune.aspx या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जानेवारी २०१७.