इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटरोलॉजी, पुणे येथे रिसर्च असोसिएटशिपच्या ७ जागा तर रिसर्च फेलोशिपच्या १५ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी, पुणेची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.tropmet.res.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०१७.

केंद्रीय गृहमंत्रालयांतर्गत गुप्तचर विभागात कनिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्यांच्या १६१ जागा-

अर्जदारांनी १२ वीची परीक्षा गणित व भौतिकशास्त्र विषयांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची रेडिओ टेक्निशियन, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन यासारख्या विषयातील पात्रता पूर्ण केलेली असावी व त्यांना संबंधित क्षेत्रातील कामाचा कमीत कमी २ वर्षांचा अनुभव असायला हवा. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ४ ते १० मार्च २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय गुप्तचर विभागाची जाहिरात पाहावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज जॉइंट डेप्युटी डायरेक्टर/ जी, इंटेलिजन्स ब्यूरो, गृह मंत्रालय, ३५, एस. पी. मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली- ११००२१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३ मे २०१७.

रिलायन्स कंपनीच्या सुरक्षा विभागात जागतिक स्तरावरील संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी इच्छुक उमेदवारांनी https://rgsscareers.ril.com/Main.aspx संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी करावी.

पश्चिम रेल्वेमध्ये मुंबई येथे करारतत्त्वावर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या १५ जागांसाठी थेट मुलाखत-

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली पश्चिम रेल्वेची जाहिरात पाहावी अथवा पश्चिम रेल्वेच्या www.wr.indianrailways.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तपशीलवार अर्ज व कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी २७ एप्रिल २०१७ रोजी सकाळी ११.३० वाजता उपस्थित राहावे. स्थळ-पश्चिम रेल्वे, जगजीवनराम रुग्णालय, पश्चिम रेल्वे, मुंबई सेंट्रल.

ऑइल अ‍ॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनमध्ये असिस्टंट लीगल अ‍ॅडव्हायजरच्या १५ जागा-

अर्जदारांनी कायदा विषयातील पदवी कमीत कमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वकिलीविषयक कामाचा ३ वर्षांचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य. वयोमर्यादा ३० वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १८ ते २४ मार्च २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली ऑइल अ‍ॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनची जाहिरात पाहावी अथवा ओएनजीसीच्या www.ongcindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ एप्रिल २०१७