अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, भुवनेश्वर येथे नर्सिग ऑफिसर/ स्टाफ नर्ससाठी संधी –
अर्जदार नर्सिग विषयातील पदवीधर असाव्यात. त्यांची नर्सिग काऊंसिलकडे नोंदणी केलेली असावी व त्यांना संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव असायला हवा. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, भुवनेश्वरची जाहिरात पहावी अथवा संस्थेच्या http://www.aiimsbhubaneswar.edu.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ डिसेंबर २०१७.
इनलँड वॉटरवेज अॅथॉरिटी ऑफ इंडियामध्ये टेक्निकल असिस्टंटच्या १० जागा –
अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली इनलँड वॉटरवेज अॅथॉरिटी ऑफ इंडियाची जाहिरात पहावी अथवा अॅथॉरिटीच्या www.iwai.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ डिसेंबर २०१७.
ओएनजीसी पेट्रो अॅडिशन्समध्ये एचआर एक्झिक्युटिव्हच्या ४ जागा –
अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली ओएनजीसी पेट्रो अॅडिशन्सची जाहिरात पहावी अथवा कंपनीच्या http://www.opalindia.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ डिसेंबर २०१७.
टपाल विभागात पुणे येथे वाहन चालकांच्या ३ जागा –
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत व त्यांच्याजवळ हलके व अवजड वाहन चालनाचा वैध परवाना असायला हवा. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली टपाल विभाग, पुणेची जाहिरात पहावी.विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज मॅनेजर, मेल मोटर सव्र्हिस, जीपीओ कंपाऊंड, पुणे ४११००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २७ डिसेंबर २०१७.
सैन्यदलाच्या कंट्रोलर ऑफ डिफेन्स अकाउंटस (आर्मी) मध्ये कँटीन अटेंडंटच्या ९ जागा –
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व कॅटरिंग वा हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटची पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा २५ वर्षे.अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाच्या कंट्रोलर ऑफ डिफेन्स अकाउंटसची जाहिरात पहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज कंट्रोलर ऑफ डिफेन्स अकाउंटस् (आर्मी), बेलवेद्रे कॉम्प्लेक्स, आयुध पथ, मीरत छावणी, मीरत- २५०००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २६ डिसेंबर २०१७.
ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस, भोपाळ येथे टेक्निकल असिस्टंटच्या १६ जागा –
अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेसची जाहिरात पाहावी सायन्सेसची जाहिरात पहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.aiimsbhopal.edu.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ डिसेंबर २०१७