महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे संशोधन अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी गट व (राजपत्रित) पदाच्या ३८ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात पहावी. दूरध्वनी क्र. ०२२- २२६७०२१० अथवा २२७९५९०० वर संपर्क साधावा अथवा लोकसेवा आयोगाच्या  https://www.mpsc.gov.in/    अथवा  https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx  या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मे २०१७.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयात तांत्रिक अधिकारी (वन विभाग) पदाच्या ३ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २२ ते २८ एप्रिल २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पहावी अथवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in अथवा http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मे २०१७.

महाराष्ट्र शासनाच्या महिला आर्थिक विकास महामंडळ- मुंबई अंतर्गत विविध संधी- 

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली महिला आर्थिक विकास महामंडळाची जाहिरात पहावी अथवा महामंडळाच्या http://www.mavimindia.org  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मे २०१७.