’ नॅशनल सेंटर फॉर रेडिओ- अॅस्ट्रोफिजिक्स, पुणे येथे अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनीच्या २ जागा-
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर व टंकलेखन व संगणकाचे पात्रताधारक असावेत. इंग्रजीवर प्रभुत्व आवश्यक. वयोमर्यादा २८ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्स, पुणेच्या दूरध्वनी क्र. ०२०- २५७१९००० वर संपर्क साधावा अथवा सेंटरच्या http://www.ncra.tifr.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज साध्या टपालाने अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्स, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, पोस्ट बॅग ३, गणेशखिंड, पुणे विद्यापीठ परिसर, पुणे- ४११००७ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १० मार्च २०१७.
’ केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयांतर्गत औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नाशिक व पुणे येथे मिळून असिस्टंट अकाऊंट्स ऑफिसरच्या ५१ जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ११ ते १७ फेब्रुवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्र सरकारच्या कंट्रोलर जनरल ऑफ अकाऊंट्सची जाहिरात पाहावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज कंट्रोलर जनरल ऑफ अकाऊंट्स, डिपार्टमेंट ऑफ एक्स्पेंडिचर,
महालेखा नियंत्रक भवन, ब्लॉक- ई, सीजीओ कॉम्प्लेक्स, आयएनए, नवी दिल्ली या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १० मार्च २०१७.
* भारत इलेक्ट्रॉनिकमध्ये डेप्युटी इंजिनीअर्सच्या २३ जागा-
अर्जदारांनी इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग यासारख्या विषयातील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संबंधित क्षेत्रातील कामाचा सुमारे ४ वर्षांचा अनुभव असायला हवा.
वयोगट २५ ते ३२ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या http://www.bel-india.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मार्च २०१७.
’ भारतीय वायुदलात ठाणे येथे स्टोअरकीपरच्या २ जागा-
अर्जदार बारावी उत्तीर्ण असावेत व त्यांना स्टोअरकीपिंगविषयक कामाचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १८ ते २४ फेब्रुवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय वायुदलाची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील अर्ज कमांड अॅडमिन ऑफिसर, एअरफोर्स स्टेशन, कोलशेत रोड, पोस्ट सँडोझ बाग, ठाणे- ७ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ११ मार्च २०१७.
* भारतीय वायुदलात मुंबई येथे सुपरिटेंडेंट (स्टोर्स)च्या २ जागा-
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत व त्यांना स्टोर्सविषयक कामाचा अनुभव असायला हवा.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १८ ते २४ फेब्रुवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय वायुदलाची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील व संपूर्णपणे भरलेले अर्ज कमांड अॅडमिन ऑफिसर, एअरफोर्स स्टेशन, कलिना मिलिटरी कॅम्प, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई ४०००२९ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ११ मार्च २०१७.
* एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी, बंगलोर येथे सायंटिस्ट/ इंजिनीअरच्या १० जागा-
अर्जदार इंजिनीअरिंग, टेक्नॉलॉजी, एरोनॉटिकल, एरोस्पेस, मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदवीधर असावेत व त्यांना संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असायला हवा. पीएचडी पात्रताधारकांना प्राधान्य. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १८ ते २४ फेब्रुवारी २०१७ च्या अंकातील एरोनॉटिकल अॅथॉरिटी, बंगलोरची जाहिरात पाहावी अथवा अॅथॉरिटीच्याwww.ada.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मार्च २०१७.