इंडियन ऑइलच्या रिफायनरी डिव्हिजनमध्ये ह्य़ुमन रिसोर्स ऑफिसरच्या ५० जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली इंडियन ऑइलची जाहिरात पाहावी अथवा इंडियन ऑइलच्या http://www.iocl.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०१७.
काँबॅट व्हेईकल रिसर्च अॅण्ड डेव्हल्पमेंट एस्टॅब्लिशमेंट, चेन्नई येथे प्रशिक्षणार्थी उमेदवारांच्या १४६ जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ४ ते १० नोव्हेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली काँबॅट व्हेईकल रिसर्च अॅण्ड डेव्हल्पमेंट एस्टॅब्लिशमेंट, चेन्नईची जाहिरात पाहावी अथवा https://rac.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०१७.
संरक्षण मंत्रालयांतर्गत सीनिअर क्वालिटी अॅशुरन्स एस्टॅब्लिशमेंट, जबलपूर येथे टेक्निशियन्सच्या २४ जागा –
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असायला हवेत. वयोमर्यादा २७ वर्षे. अर्जाचा नमुना तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ४ ते १० नोव्हेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली सीनिअर क्वालिटी अॅशुरन्स एस्टॅब्लिशमेंट, जबलपूरची जाहिरात पाहावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज दि कमांडंट, सीनिअर क्वालिटी अॅशुरन्स एस्टॅब्लिशमेंट, खमारीया, जबलपूर-४८२००५ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०१७.
सॉइल अॅण्ड लँड यूज सव्र्हे ऑफ इंडियामध्ये सुपरिटेंडंटच्या ५ जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २३ ते २९ ऑक्टोबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली सॉइल अॅण्ड लँड यूज सव्र्हे ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेला अर्ज चीफ सॉइल सव्र्हे ऑफिसर, सॉइल अॅण्ड लँड यूज सव्र्हे ऑफ इंडिया, आयएआरआय बिल्डिंग, पूसा परिसर, नवी दिल्ली ११००१२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २७ नोव्हेंबर २०१७.
इंजिनीअर्स इंडियामध्ये प्रशिक्षणार्थी इंजिनीअर्सच्या २२९ जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली इंजिनीअर्स इंडियाची जाहिरात पाहावी अथवा ईआयएलच्या http://www.engineersindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०१७.
भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये डेप्युटी इंजिनीअर इलेक्ट्रॉनिक्सच्या १८ जागा-
अर्जदार इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमधील पदवीधर असावेत व त्यांना संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा २७ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली भारत इलेक्ट्रॉनिक्सची जाहिरात पाहावी अथवा बीईएलच्या http://www.bel-india.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०१७.
राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण महाविद्यालय, नागपूर येथे प्रशिक्षक म्हणून संधी-
अर्जदार बारावी उत्तीर्ण, शारीरिकदृष्टय़ा सक्षम व अग्निशमनविषयक पात्रताधारक असावेत आणि त्यांना संबंधित क्षेत्रातील कामाचा दोन वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण महाविद्यालय, नागपूरची जाहिरात पाहावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज उपसंचालक, राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालय, ६१/१, टेंपल रोड, सिव्हिल लाइन्स, नागपूर ४४०००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २७ नोव्हेंबर २०१७.