महाराष्ट्र राज्याचा २०१७-१८चा अर्थसंकल्प विधानसभेत मांडण्यात आल्यावर त्याबाबतची माहिती, चर्चा वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांमधून होत आहे. यातील पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने आवश्यक मुद्दे माहिती व तरतुदींचा गेषवारा येथे देत आहोत.
प्रस्तावित योजना व उपक्रम
- गट शेती योजना – राज्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी गट स्थापन करण्यात येतील. या योजनेमध्ये किमान २० शेतकऱ्यांचा एक गट व त्यांच्या किमान १०० एकर शेतजमिनीचा समावेश असेल. क ोणत्याही शेतकऱ्याची जमीन १० एकरांपेक्षा अधिक असणार नाही. असे शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येतील.
- नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना – जागतिक तापमानवाढ व हवामानबदल यापासून शेती सुरक्षित करण्यासाठी मराठवाडय़ातील ४ हजार गावांतील शेतीस दुष्काळापासून संरक्षित करण्यासाठी तसेच विदर्भातील पूर्णा खोऱ्यातील १ हजार गावांमधील क्षारतेच्या समस्येवर मात करण्यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी’ प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे.
- मनरेगा – १ एप्रिल २०१७ पासून मनरेगाचा मजुरी दर प्रत्येक दिवशी १९२ रुपयांवरून २०१ रुपये करण्यात येणार आहे.
- खेकडा उपज केंद्र – राज्यातील खेकडा उत्पादन थेट निर्यात होते. मात्र खेकडय़ाचे उपज केंद्र (Hatchery) तामिळनाडू मध्ये आहे. तामिळनाडूच्या उपज केंद्राच्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यत खेकडा उपज केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
- महाराष्ट्रातील प्रलंबित रेल्वे प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी ‘महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत सुविधा विकास कंपनी’ची स्थापना रेल्वे मंत्रालयाच्या भागीदारीतून करण्यात येणार आहे.
- सागरमाला कार्यक्रम – गोराई, वसई, भाइंदर, नारंग्री, खारवा देषरी, मानूरी, घोडबंदर आणि मालवण प्रवासी जेट्टी यांचा विकास करण्यात येणार आहे.
- चेन िलक फेिन्सग योजना – शामा प्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेची व्याप्ती वाढवून वन्य प्राण्यांमुळे होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे.
- सारथी – राज्यातील मागास प्रवर्गाच्या समस्या समजून त्यांच्या विकासाबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी राजर्षी शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (Rajarshree Shahu Maharaj Research, Training and Human Development Instituts SARTHI)
- अस्मिता योजना – ग्रामीण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील व जिल्हा परिषद शाळांतील किशोरवयीन मुलींना सवलतीच्या दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याची योजना.
- माहुरगड (नांदेड), ज्योतिबा (कोल्हापूर), रायगड व सिंधुदुर्ग किल्ले व लोणार सरोवराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याची योजना.
- प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत १ लाख २२ हजार युवकांना प्रशिक्षण.
- गवंडी कारागिरांना प्रशिक्षण देऊन १० हजार गवंडी कारागिरांना रोजगार.
- चंद्रपूर येथे सनिकी शाळा सुरू करण्यासाठी २०० कोटी.
- वाढवण, जि. पालघर येथे देशातील पहिले कॉर्पोरेट मेजर पोर्ट उभारणार.
- पायाभूत सुविधांकरिता मोठय़ा प्रमाणात भांडवल उभारणीसाठी ‘महाइन्फ्रा’ या विशेष हेतुवहन यंत्रणेची स्थापना करणार.
- मराठवाडय़ातील दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रिडची उभारणी करण्यात येणार आहे.
- महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानासाठी ११०० कोटी रुपये.
- माकडताप रोगनिदान उपचार प्रशिक्षण व संशोधनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रयोगशाळा.
- मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी चेन िलक फेिन्सग योजना.
- नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या धर्तीवर महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा सुरू करणार.
- सन २०१६-१७ चा ऊस खरेदी कर माफ. सन २०१५-१६च्या ऊस खरेदी करमाफीसाठीची साखर निर्यातीची अट काढण्यात आली.
- जीवनावश्यक वस्तू जसे तांदूळ, गहू, डाळी व त्यांचे पीठ तसेच हळद, मिरची, चिंच, गूळ, नारळ, धणे, मेथी, पापड, ओला खजूर, सोलापुरी चादर, टॉवेल यांच्यावरील करमाफी सुरू ठेवणार. आमसुलास नव्याने करमाफी.
- शेततळ्यासाठीच्या जीओ मेमब्रेनवरील कर ६% वरून ०%
- सॉइल टेस्टिंग किट तसेच मिल्क टेस्टिंग किट यांच्यावरील विक्रीकराचा दर १३.५% वरून ०%
- कॅशलेस व्यवहाराकरिता कार्ड स्वाइप मशीनवरील कर १३.५% वरून ०% (मशीनच्या खरेदीवरील कर माफ, व्यवहारावरील कर नाही.)
करवृद्धी
- देशी व विदेशी मद्यावरील कमाल विक्री किमतीवर मूल्यवíधत कराचा दर २३.०८% वरून २५.९३%.
- साप्ताहिक लॉटरीवरील कर रु. ७०,००० वरून रुपये १ लक्ष.
प्रशासकीय बदल
- महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणाच्या तीन नवीन खंडपीठांची निर्मिती.
- खासगी कंपनीच्या संचालकांकडून कंपनीची मूल्यवíधत कराची थकबाकी वसूल करता येणार.