तंबाखू सेवनामुळे जगामध्ये दर वर्षी जवळपास ६० लक्ष लोकांचा मृत्यू होतो. सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
उद्दिष्टे
- तंबाखूमुळे आरोग्यावर होणार दुष्परिणाम आणि तंबाखू नियंत्रण कायदय़ाविषयी मोठय़ा प्रमाणावर जनजागृती करणे.
- सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायदा २००३ याची प्रभावीपणे अंमलबजावणी.
उपक्रम
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
- तंबाखूच्या दुष्परिणामाविषयी आणि तंबाखू नियंत्रण कायद्याविषयी संबंधित शासकीय / खासगी संस्थांच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
- तंबाखूच्या दुष्परिणामाविषयी विविध पद्धतींचा अवलंब करून जनजागृती करणे
- शालेय विद्यार्थी आणि शिक्षक यांना तंबाखूमुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामाविषयी प्रशिक्षण देणे
- जिल्हा स्तरावर तंबाखू व्यसनमुक्तीकरिता समुपदेशन केंद्र चालविणे
- तंबाखू नियंत्रण कायदय़ाच्या अंमलबजावणीबाबत तांत्रिक मदत करणे
- सरकारी विभाग आणि बिनसरकारी संस्थांबरोबर कामे करून तंबाखू नियंत्रण करणे.
स्वयंसेवी संस्थांची भूमिका
- जिल्हास्तरावर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बिगर सरकारी संस्थांचा सहभाग घेऊ शकतात
- आरोग्य कर्मचारी कायदा अंमलबजावणी, महिला बचत गट तसेच इतर संस्था यांना तंबाखू नियंत्रणबाबत प्रशिक्षण देऊ शकतात.
- शालेय विदय़ार्थ्यांमध्ये तंबाखूविरोधी जनजागृती करण्यासाठी व तसेच जिल्हास्तरावर तंबाखूमुक्त शाळा ही संकल्पना राबवू शकतात.