scorecardresearch

Government Job: फोटोग्राफर्सना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; महिलांसाठी जागा राखीव, पहा अर्जाची प्रक्रिया

सर्व अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे.

Government Job: फोटोग्राफर्सना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; महिलांसाठी जागा राखीव, पहा अर्जाची प्रक्रिया
प्रातिनिधिक फोटो

Government Job 2022: जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल व सोबतच आपण सिनेमेटोग्राफी किंवा फोटोग्राफी मध्ये डिप्लोमा केलेला असेल तर आपल्यासाठी सरकारी नोकरीची एक सुवर्णसंधी आहे. ओडिशा कर्मचारी चयन आयोग OSSC मध्ये वरिष्ठ कॅमेरामॅन, फोटोग्राफर व अन्य पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना १० ऑगस्ट पासून अर्ज करता येणार आहे तर अर्जाची शेवटची तारीख ९ सप्टेंबर आहे. सर्व अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ ossc.gov.in च्या माध्यमातून पार पडणार आहे.

पात्रता निकष

इच्छुक उमेदवार किमान १० वी पास असणे आवश्यक आहे. फोटोग्राफी किंवा सिनेमेटोग्राफी मध्ये डिप्लोमा डिग्री असणे गरजेचे आहे. अर्जदार उमेदवारांसाठी हे १८ ते ३८ वयोमर्यादा आहे.

पगार

वरिष्ठ कॅमेरामॅन तसेच फोटोग्राफर या पदावरील उमेदवारांना सुरुवातीला २५,३०० पर्यंत प्रति महिना पगार असेल तर इंडेक्स व असिस्टंट ऑपरेटर पदासाठी १२,६०० रुपयांपर्यंत स्टायपेंड दिले जाणार आहे.

सध्या ओडिशा कर्मचारी चयन आयोगतर्फे ९ पदांवर भरती होणार आहे. ज्यामध्ये २ वरिष्ठ कॅमेरामॅन, ३ फोटोग्राफर, ३ इंडेक्सर व असिस्टंट ऑपरेटर पदासाठी ७ जागा रिक्त आहेत . यामध्ये महिलांसाठी कॅमेरामॅन, फोटोग्राफर, इंडेक्सर साठी प्रत्येकी १ व असिस्टंट ऑपरेटरसाठी ३ जागा राखीव आहे. आयोगाच्या माहितीनुसार, महिलांसाठी राखीव असलेल्या जागांवर निवड झाल्यावर जर संबंधित उमेदवाराने नोकरीवर रुजू होण्यास नकार दिला तर सदर जागा ही इतर पुरुष उमेदवारीसाठी सुद्धा खुली असेल.

दरम्यान, ओडिशा कर्मचारी चयन आयोगातर्फे ossc.gov.in या वेबसाईटवर अर्जाची संपूर्ण प्रक्रिया व नियम देण्यात आले आहेत. अर्जदारांना कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाहीत त्यामुळे कोणतीही फी मागणारी वेबसाईट खोटी आहे हे लक्षात घ्या. इच्छुकांनी अर्ज स्विकारण्याच्या तारखेपासून लवकरात लवकर अर्ज करावे अन्यथा शेवटपर्यंत थांबून ऐनवेळी येणाऱ्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.