Sarkari Naukri Bank PO: बँकिंग कर्मचारी निवड संस्थेने प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये भरतीसाठी आईबीपीएस आरआरबी अधिसूचना २०२२ (IBPS RRB Notification 2022) जारी केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे कार्यालयीन सहाय्यक (लिपिक) आणि अधिकारी स्केल १, २ आणि ३ च्या विविध पदांची भरती केली जाईल. यासाठी नोंदणी आज ७ जून २०२२ पासून सुरू झाली आहे. पीओ, आईबीपीएस आरआरबी क्लर्क आणि आईबीपीएस आरआरबी एसओ साठी उमेदवार अधिकृत वेबसाइट – ibps.in वर जाऊन अधिक तपशील तपासू शकतात. या भरती प्रक्रियेतून एकूण ८०८१ पदे भरायची आहेत.

उमेदवारांनी कृपया लक्षात घ्या की सर्व आईबीपीएस आरआरबी क्लर्क २०२२, आईबीपीएस आरआरबी पीओ २०२२ आणि आईबीपीएस आरआरबी एसओ २०२२ साठी आवश्यक तारखा समान आहेत. वेळेवर अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी या महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवाव्यात आणि त्यानुसार अर्ज करावेत.

(हे ही वाचा: NABARD recruitment 2022: नोकरीची संधी; अर्ज प्रक्रिया सुरु, जाणून घ्या अधिक तपशील)

या भरतीतून ४३ बँका भरती करायच्या आहेत. सर्व बँकांमध्ये प्रत्येक पदासाठी वेगवेगळी पदे असून त्यावरील भरती IBPS मार्फत केली जात आहे. उमेदवारांना अर्ज शुल्क देखील भरावे लागेल. ऑफिसर स्केल I, II, III आणि ऑफिस असिस्टंटसाठी, SC/ST/PwBD श्रेणीतील उमेदवारांना १७५ रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल तर इतर सर्वांना ८५० रुपये भरावे लागतील.

(हे ही वाचा: Maharashtra HSC Result 2022: उद्या होणार जाहीर बारावीचा निकाल; कसा आणि कुठे पहायचा? जाणून घ्या)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या भरतीसाठी आज, ७ जूनपासून नोंदणी सुरू झाली आहे. नोंदणी करण्याची अंतिम तारीख २७ जून २०२२ आहे. या पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी, पीईटी १८ ते २३ जुलै दरम्यान होणार आहे. तर IBPS RRB PO, SO, लिपिक ऑनलाइन परीक्षा ऑगस्टमध्ये घेणे अपेक्षित आहे.