भारतीय रेल्वे चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये ४९२ अप्रेंटिस पदांची भरती करेल. अधिकृत अधिसूचनेनुसार, मशिनिस्ट, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, फिटर, टर्नर, पेंटर आणि एसी मेकॅनिकसह विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट apprenticeshipindia.org द्वारे अर्ज करू शकतात. अपरेंटिस भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ ऑक्टोबर आहे. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय परीक्षा (एनसीव्हीटी) उत्तीर्ण केली पाहिजे आणि संबंधित ट्रेडमधील प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यांनी कौन्सिल ऑफ बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशन इन इंडिया (COBSE) द्वारे मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

असा करा अर्ज

स्टेप १: अप्रेन्टिसच्या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार, सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट apprenticeshipindia.org ला भेट द्या.

स्टेप २ : नाव, मोबाईल नंबर आणि जन्मतारीख सारख्या तपशीलांसह लॉगिन करा आणि स्वतःची नोंदणी करा

स्टेप ३ : विचारल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

स्टेप ४ :फॉर्म डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.

उमेदवारांना कोणत्याही लेखी परीक्षेमध्ये किंवा मुलाखत/ तोंडी परीक्षेत प्रशिक्षणार्थी पदाच्या कोणत्याही निवडीसाठी उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. पोर्टलवर दिलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे अॅक्ट अप्रेंटिसची नियुक्ती केली जाईल. जर उमेदवारांना कोणत्याही पदासाठी शॉर्टलिस्ट केले गेले असेल तर त्यांना कॉल लेटरद्वारे त्याबद्दल माहिती दिली जाईल जी त्यांच्या संबंधित मेल आयडीवर पाठविली जाईल