सेंट्रल फॉरेंसिक सायन्स लेबॉरेटरी, पुणे येथे हिंदी भाषांतरकार म्हणून संधी
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १० ते १६ सप्टेंबर २०१६च्या अंकात प्रकाशित झालेली सेंट्रल फॉरेंसिक सायन्स लेबॉरेटरी, पुणेची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज को- ऑर्डिनेटर, सेंट्रल फॉरेंसिक सायन्स लॅबोरेटरी, ३८/४, कृष्ण कॉम्प्लेक्स, खराडी बायपास खराडी, पुणे- ४११०१४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ९ नोव्हेंबर २०१६.
वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ को- ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, पुणे येथे करार तत्त्वावर अॅकेडमिक असोसिएट्स म्हणून संधी.
अधिक माहिती व तपशिलासाठी वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंटच्या दूरध्वनी क्र. ०२०-६६२२१४००वर संपर्क साधावा अथवा इन्स्टिटय़ूटच्या www.vamnicom.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर, वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, चतु:शृंगी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्ग, पुणे- ४११००७ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०१६.
सैन्यदलात अधिकारी (धार्मिक विधी)- पंडित पदाच्या ५९ जागा
उमेदवारांनी संस्कृत/ हिंदी विषयासह पदवी घेतलेली असावी अथवा त्यांनी संस्कृतमधील मध्यमा अथवा हिंदीमधील भूषण पात्रता पूर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा ३४ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ८ ते १४ ऑक्टोबर २०१६च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाची जाहिरात पाहावी. अथवा सैन्यदलाच्या www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०१६
‘सी’डॅकमध्ये पुण्यासह इतरत्र सीनिअर ऑफिसर (एचआरडी)च्या २ जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २२ ते २८ ऑक्टोबर २०१६च्या अंकात प्रकाशित झालेली सी-डॅकची जाहिरात पाहावी अथवा सी-डॅकच्या www.cdac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ नोव्हेंबर २०१६.
इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, नागपूर येथे स्टोअर्स ऑफिसर म्हणून संधी
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १० ते १६ सप्टेंबर २०१६च्या अंकात प्रकाशित झालेली इंडियन ब्युरो ऑफ माइन्सची जाहिरात पाहावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज कंट्रोलर जनरल, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, इंदिरा भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर- ४४०००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ९ नोव्हेंबर २०१६.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट (बार्टी), पुणेच्या मेंटोरिंग दि मेरिट उपक्रमांतर्गत संधी
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘बार्टी’ पुणेच्या https://barti.maharashtra.gov.in> Notice Board > Mentoring the merit- Information Document and application form या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले तपशीलवार अर्ज डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, बार्टी, २८, क्वीन्स गार्डन कॅम्प, पुणे- ४११००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०१६.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागात पब्लिक प्रॉक्सिक्युटरच्या ४७ जागा
अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २२ ते २८ ऑक्टोबर २०१६च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in अथवा http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०१६.
सेंट्रल सिल्क बोर्ड, बंगलोर येथे वैज्ञानिकांच्या ६ जागा
उमेदवारांनी विज्ञान, कृषी विज्ञान यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संबंधित क्षेत्रातील कामाचा ४ वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ३५ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १५ ते २१ ऑक्टोबर २०१६च्या अंकात प्रकाशित झालेली सेंट्रल सिल्क बोर्ड, बंगलोरची जाहिरात पाहावी अथवा www.csb.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०१६.