Maharashtra Board HSC 2022 Seat Number : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) ८ जून रोजी दुपारी १ वाजता महाराष्ट्र राज्यातील बारावीचा निकाल निकाल जाहीर करेल. दरवर्षी १० लाखांहून अधिक विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा देतात. गेल्या वर्षी १२ लाख विद्यार्थ्यांपैकी ९९.६३टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. महाराष्ट्र बोर्डाची ही आतापर्यंतची सर्वाधिक उत्तीर्ण टक्केवारी आहे.

पण महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा आसन क्रमांक अर्थात सीट नंबर माहित असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला सीट नंबर/रोल नंबर माहित नसेल तर आत्ताच शोधून ठेवा. जाणून घ्या महाराष्ट्र बोर्ड बारावीचा रोल नंबर/आसन क्रमांक कसा शोधू शकता?

(हे ही वाचा: Maharashtra HSC Result 2022: उद्या लागणार बारावीचा निकाल; जाणून घ्या कसा आणि कुठे पाहता येईल)

‘असा’ शोधा सीट नंबर

  • महाराष्ट्र बोर्डाने सीट नंबर शोधण्यासाठी लिंक जारी केली आहे.
  • mh-hsc.ac.in 2022 यावर तुम्ही सीट नंबर शोधू शकता.
  • या लिंकवर क्लिक करा. नंतर महाराष्ट्र बोर्ड सीट नंबर शोधणारे पेज उघडेल.
  • येथे तुम्हाला तीन गोष्टी विचारल्या जातील. तुमचा जिल्हा, तालुक्याचे नाव आणि तुमचे पूर्ण नाव. तुम्ही परीक्षेच्या फॉर्ममध्ये जी माहिती भरली होती, तीच इथे भरा.
  • नाव लिहिण्याची पद्धत – आधी आडनाव, नंतर नाव आणि नंतर मधले नाव लिहा.
  • ही तिन्ही माहिती भरल्यानंतर सर्च बटणावर क्लिक करा. तुमचा सीट नंबर स्क्रीनवर दिसेल.
  • हा नंबर लिहून ठेवा.

(हे ही वाचा: Maharashtra HSC Result 2022: उद्या होणार जाहीर बारावीचा निकाल; कसा आणि कुठे पहायचा? जाणून घ्या)

कुठे तपासायचा निकाल?

निकाल जाहीर झाल्यानंतर, निकाल msbshse.co.in, hscresult.11thadmission.org.in, hscresult.mkcl.org, mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल.

(हे ही वाचा: Maharashtra HSC Result 2022: महाराष्ट्र बोर्डाचा १२वीचा निकाल ‘या’ तारखेला अपेक्षित; जाणून घ्या अधिक तपशील)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘असा’ तपासा निकाल

  • महाराष्ट्र बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम MSBSHSE च्या अधिकृत वेबसाईट maharesult.nic.in किंवा hscresult.mkcl.org किंवा msbshse.co.in वर जा.
  • होमपेजवर, MSBSHSE १२वी निकाल २०२२ या लिंकवर क्लिक करा, निकाल जाहीर होताच लिंक सक्रिय होईल.
  • तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख एंटर करा, कॅप्चा टाका आणि सबमिट वर क्लिक करा.
  • तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल, तुम्ही खाली डाउनलोड करून सेव्ह करून डेस्कटॉपवर सेव्ह करू शकता.

गेल्या वर्षी कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्र बोर्डाने दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकन आणि चाचणीच्या आधारे उत्तीर्ण करण्यात आले होते. परंतु यंदा परीक्षा परीक्षा दरवर्षीप्रमाणेच झाल्या होत्या.