राज्य सामान्य प्रवेश चाचणी कक्षाने पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) आणि पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) गटांसाठी महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा उत्तरतालिका (answer key)जारी केली आहे. आज १३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थी mhtcet2021.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळाद्वारे जरी केलेल्या उत्तरपत्रिके विरोधात आक्षेप नोंदवू शकतात.

जे विद्यार्थी MHT CET 2021 ला बसले आहेत ते त्यांच्या प्रवेश परीक्षेचा रोल नंबर आणि जन्मतारीख वापरून अधिकृत संकेतस्थळाद्वारे उत्तरपत्रिके (answer key)मध्ये प्रवेश करू शकतात. उत्तर की सोबत, MHT CET प्रश्नपत्रिका आणि उमेदवारांच्या उत्तरपत्रिका देखील वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

(हे ही वाचा: जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे ‘या’ पदासाठी होणार भरती; जाणून घ्या तपशील )

कसा घेता येईल आक्षेप?

अधिकृत वेबसाइट mhtcet2021.mahacet.org वर जा.

मुख्यपृष्ठावर, महत्त्वाच्या लिंक विभागाखाली ‘Click here for Answer keys’ असे लिहीलेल्या लिंकवर क्लिक करा.

उमेदवारांना नवीन लॉगऑन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल.

रोल नंबर आणि जन्मतारीख टाका.

‘लॉग इन’ बटणावर क्लिक करा.

फॉर्म भरून आक्षेप नोंदवा.

आक्षेप शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.

( हे ही वाचा: Pune Jobs: भारती विद्यापीठ पुणे येथे नोकरीची संधी; जाणून घ्या तपशील)

कोणत्याही प्रश्नावर आक्षेप घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति प्रश्न १०० रुपये शुल्क भरावे लागेल आणि त्यांना मानक संदर्भ सादर करावा लागेल. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या आव्हानांचा विचार केल्यानंतर राज्य सेल MHT CET 2021 अंतिम जारी करेल आणि MHT CET 2021 चा निकाल अंतिम उत्तरपत्रिकावर आधारित असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य सेल नुसार, MHT CET निकाल २८ ऑक्टोबर रोजी किंवा घोषित केले जातील. PCB (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) आणि PCM (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) गटांसाठी प्रवेश परीक्षेचे निकाल अधिकृत वेबसाइटवर जाहीर केले जातील.