SBI Recruitment 2021: भारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये नोकरी करायची संधी शोधणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. भारतीय स्टेट बँक ने सर्किल बेस्ड ऑफिसर (SBO) या रिक्त पदासाठी अर्ज मागवले आहेत. या रिक्त पदांची संख्या १२२६ आहे आणि अर्जाची प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटही तारीख २९ डिसेंबर २०२१. प्रवेश पात्र १२ जानेवारी २०२२ ला जारी केलं जाईल आणि परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उमेदवारांना या भरती प्रक्रियेत सहभागी होयचे असल्यास लवकरात लवकर अर्ज करण्याचा सल्ला दिला जातो कारण शेवटची तारीख जवळ आली आहे आणि नंतर जास्त ट्रैफिक लोडमुळे अर्जात करताना अडचणी येऊ शकतात.

( हे ही वाचा: IAF Group C Recruitment 2022: एअरफोर्समध्ये दहावी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया)

शैक्षणिक पात्रता आणि वायोमार्यदा काय आहेत?

या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दुसऱ्या यादीत येणाऱ्या कोणत्याही व्यावसायिक बँक किंवा कोणत्याही प्रादेशिक बँकेत किमान २ वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा २१ ते ३० वर्षे आहे.

(हे ही वाचा: Indian Navy Recruitment 2021: १२वी पाससाठी भारतीय नौदलात नोकरीची संधी; पगार ४३ हजारांहून अधिक)

निवड प्रक्रिया कशी असेल?

भारतीय स्टेट बँकद्वारे निघालेली ही भरती ३ फेऱ्यांमध्ये होईल. पहिल्या फेरीत लेखी परीक्षा दुसऱ्या फेरीत स्क्रीनिंग आणि तिसऱ्या फेरीत मुलाखत होईल. या सगळ्या फेऱ्यांमध्ये पास झाल्यावर उमेदवाराची निवड होईल.

( हे ही वाचा: Railway Recruitment 2021: मध्य रेल्वेतील भरतीसाठी आजपासून नोंदणी सुरू, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया)

‘असा’ करा अर्ज

स्टेप १ – SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट द्या.

स्टेप २ – मुख्यपृष्ठावर दिसणार्‍या SBI CBO भरतीशी संबंधित लिंकवर जा.

स्टेप ३ – विनंती केलेली माहिती भरा आणि नोंदणी करा.

स्टेप ४ – आयडी आणि पासवर्डसह लॉगिन करून अर्ज भरा.

स्टेप ५ – आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा आणि अर्ज फी भरा.

स्टेप ६ – तुमचा अर्ज डाउनलोड करा आणि प्रिंट आउट घ्या.

अधिकृत नोटीफीकेशन इथे वाचा.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sbi recruitment 2021 golden job opportunity bank bumper recruitment know how to apply ttg
First published on: 21-12-2021 at 16:31 IST