एसबीआयमध्ये ५५ मॅनेजर पदांसाठी भरती सुरू झाली असून त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर २०२२ आहे. एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्ही मॅनेजर पदासाठी अर्ज करू शकता. हा अर्ज करताना उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव, रेज्युमे, जातीचे प्रमाणपत्र, आयडी प्रूफ, वयाचा दाखला देणारे प्रमाणपत्र, इडब्लूएस प्रमाणपत्र, पीडब्लूएस प्रमाणपत्र (आवश्यकता असल्यास) असे सर्व महत्त्वाचे कागदपत्र जमा करावे लागतील.

या कागदपत्रांना जमा करता आले नाहीत तर उमेदवाराची मुलाखतीच्या फेरीसाठी निवड होणार नाही. यामध्ये ५५ पोस्टसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. ३० जुन २०२२ पर्यंत उमेदवाराचे वय २५ वर्षांपेक्षा जास्त आणि ३५ वर्षांपेक्षा कमी असावे. अर्ज करण्याच्या सोप्या स्टेप्स जाणून घ्या.

JEE 2023 candidates
JEE परीक्षेच्या उमेदवार नोंदणीत मुली आघाडीवर; पहिल्यांदाच ३० टक्क्यांहून अधिक नोंदणी
mpsc exam preparation tips in marathi
एमपीएससी मंत्र : वनसेवा मुख्य परीक्षा – अर्थशास्त्र घटक
no alt text set
ओळख शिक्षण धोरणाची : श्रेयांक हस्तांतरण
LIC AAO Recruitment 2023 vacancy for 300 posts check how to apply
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ३०० पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या कुठे करायचा अर्ज

एसबीआयमध्ये मॅनेजर पदासाठी अर्ज करण्याच्या पायऱ्या:

  • एसबीआयच्या करिअर पेजवर जा.
  • ‘RECRUITMENT OF SPECIALIST CADRE OFFICERS ON REGULAR BASIS -CREDIT ANALYST’ होमपेजवरील या पर्यायावर क्लिक करा.
  • ‘अप्लाय ऑनलाइन’ पर्याय निवडा.
  • त्यानंतर सुरू होणाऱ्या नव्या विंडोमध्ये नोंदणी करा.
  • त्यानंतर फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्र जमा करून फी भरा.
  • जर कधी गरज भासली तर त्यासाठी या फॉर्मची एक प्रिंट आउट काढून ठेवा.
  • अशाप्रकारे तुम्ही एसबीआय मॅनेजर पदासाठी अर्ज करू शकता.