मध्य रेल्वेत महिला खेळाडूंसाठी खालीलप्रमाणे विशेष संधी उपलब्ध आहेत-
जागांची संख्या : एकूण उपलब्ध जागा १४.
आवश्यक पात्रता : अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावा व त्यांनी हॉकी, कबड्डी, नेमबाजी, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, भारोत्तोलन यांसारख्या क्रीडा क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विशेष नैपुण्य प्राप्त केलेले असावे.
वयोमर्यादा : २४ वर्षे. राखीव गटातील उमेदवारांसाठी शिथिलक्षम.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना क्रीडा नैपुण्य चाचणी, शारीरिक क्षमता चाचणी व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल व त्यानुसार त्यांची निवड करण्यात येईल.
वेतनश्रेणी व फायदे : निवड झालेल्या उमेदवारांना मध्य रेल्वेमध्ये दरमहा ५२००-२०२००+२८०० या वेतनश्रेणीत नेमण्यात येईल. या वेतनश्रेणीतील मूळ वेतनाशिवाय त्यांना रेल्वेच्या नियमांनुसार इतर भत्ते व फायदे पण देय असतील.
अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून १०० रु.चा ‘असिस्टंट पर्सोनेल ऑफिसर (आरटी), रेल्वे रिक्रुटमेंट सेल, सेंट्रल रेल्वे- मुंबई’ यांच्या नावे असणारा इंडियन पोस्टल ऑर्डर पाठविणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशील : अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २४ ते ३० ऑगस्ट २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली मध्य रेल्वेची जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र, तपशील आणि पोस्टल ऑर्डरसह असणारे अर्ज असिस्टंट पर्सोनेल ऑफिसर (आरटी), चीफ पर्सोनेल ऑफिसर्स ऑफिस, जनरल मॅनेजर्स बिल्डिंग, छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई ४००००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०१३.
ज्या पात्रताधारक महिला खेळाडूंना मध्य रेल्वेत दाखल होऊन आपले करिअर करायचे असेल अशांनी या संधीचा जरूर लाभ घ्यावा.
संग्रहित लेख, दिनांक 9th Sep 2013 रोजी प्रकाशित
मध्य रेल्वेत महिला खेळाडूंसाठी विशेष संधी
मध्य रेल्वेत महिला खेळाडूंसाठी विशेष संधी उपलब्ध आहेत

First published on: 09-09-2013 at 01:05 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special opportunity to women players in central railway