Solapur Central Railway Bharti 2023 : रेल्वेत नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे मध्य रेल्वे, सोलापूर अंतर्गत ‘व्हिजिटिंग स्पेशॅलिस्ट’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहेत. तर या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२३ आहे. तर सोलापूर मध्य रेल्वे भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

सोलापूर मध्य रेल्वे भरती २०२३ –

पदाचे नाव – व्हिजिटिंग स्पेशॅलिस्ट

एकूण पदसंख्या – ९

हेही वाचा- पुण्यात नोकरीची मोठी संधी! IITM अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती सुरु, जाणून घ्या सविस्तर

शैक्षणिक पात्रता –

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी. पी. जी. पदवी प्राप्त केल्यानंतर संबंधित स्पेशालिटीशी प्रोफेशनल कामातील किमान ३ वर्षांचा अनुभव.
  • PG डिप्लोमानंतर संबंधित स्पेशालिटीमध्ये प्रोफेशनल कामातील ५ वर्षांचा अनुभव.

नोकरीचे ठिकाण – सोलापूर

वयोमर्यादा – ३० ते ६५ वर्षे.

अर्जाची पद्धती – ऑफलाईन.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य वैद्यकीय अधीक्षक, मंडल रेल्वे रुग्णालय सोलापूरच्या कार्यालयात

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/

पगार – भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना महिना ५२ हजार रुपये पगार दिला जाणार आहे.

असा करा अर्ज –

अर्ज करण्यापुर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२३ आहे.
वरील तारखे आधी संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवा.

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1tAHEmZdMxMYpf2QUIIl_k7xD7J-fCYda/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.