BEL Recruitment 2023: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये काही पदांची भरती करण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत प्रोजेक्ट इंजिनीअर I (मेकॅनिकल) / (इलेक्ट्रिकल) आणि प्रोजेक्ट ऑफिसर I या पदांच्या २२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ सप्टेंबर २०२३ आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती २०२३ –

पदाचे नाव –

प्रोजेक्ट इंजिनीअर – I (मेकॅनिकल), प्रोजेक्ट इंजिनीअर – I (इलेक्ट्रिकल), प्रोजेक्ट ऑफिसर – I

एकूण रिक्त पदे – २२

शैक्षणिक पात्रता –

  • प्रोजेक्ट इंजिनीअर – I – ५५ टक्के गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी + २ वर्षांचा अनुभव.
  • प्रोजेक्ट ऑफिसर – I – ५५ टक्केगुणांसह MBA/ MSW/ PGDM (HR) + २ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग २१ ते ३२ वर्षे.
  • ओबीसी – ३ वर्षांची सूट.
  • मागासवर्गीय – ५ ३ वर्षांची सूट.

अर्ज फी –

  • खुला/ ओबीसी/ EWS – ४७२ रुपये.
  • मागासवर्गीय – फी नाही.

नोकरीचे ठिकाण – नवी मुंबई.

अधिकृत बेवसाईट – https://bel-india.in/

हेही वाचा- १२ वी पास उमेदवारांना ठाण्यात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी महापालिका अंतर्गत भरती सुरु, जाणून घ्या सविस्तर

महत्वाच्या तारखा –

अर्ज सादर करण्याची सुरवात – २२ ऑगस्ट २०२३
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – २ सप्टेंबर २०२३

अर्ज सादर करण्याचा पत्ता – व्यवस्थापक (एचआर), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, भूखंड क्रमांक एल-१, एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र, तळोजा, नवी मुंबई – ४१० २०८, महाराष्ट्र.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1cnP6L7ykKJ_Mh519OGnEVEeZm1QPDm5b/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.