Maharashtra SSC and HSC Result 2025 Date: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच उच्च माध्यमिकच्या परीक्षेचा म्हणजेच इयत्ता १२वीच्या आणि माध्यमिकच्या परीक्षेचा म्हणजेच १०वीचा निकाल जाहीर करणार आहे. ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडली. तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत पार पडली. आता संपूर्ण राज्यभरातील विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी mahresult.nic.in आणि mahahsscboard.in वर निकाल पाहू शकतात. २०२५ महाराष्ट्र MSBSHSE चा १० वी आणि १२ वीचा निकाल पाहताना विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया निकालाची तारीख, वेळ आणि गुणपत्रक कसे पहावे.

Maharashtra SSC And HSC Result 2025: ‘या’ तारखेला जाहीर होऊ शकतात निकाल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दहावी-बारावीच्या सर्व प्रश्नपत्रिका तपासून झालेल्या आहेत. त्यामुळे लवकरच हा निकाल जाहीर होणार आहे. काही वेबसाइटनुसार, दहावीचा निकाल १५ मे २०२५ तर बारावीचा निकाल ६ मे २०२५ रोजी लागू शकतो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बारावी २०२५ च्या कॉमर्स, आर्टस आणि सायन्स या विषयांचा निकाल जाहीर करेल. महामंडळाकडून निकालाची तारीख अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली नाही.

दरम्यान तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करुन महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दहावी आणि बारावी २०२५ चा निकाल पाहू शकता. तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर msbshse.co.in आणि hscresult.mkcl.org या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल.

निकालाचे अपडेट मिळवण्यासाठी क्लिक करा

निकाल पाहण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

१. प्रथम अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in ला भेट द्या.
२. यानंतर होमपेजवरील Maharashtra SSC and HSC result साठी लिंकवर क्लिक करा.

३. आता तुमचा सीट नंबरआणि जन्म तारीख किंवा आईचे नाव टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.
४. यानंतर Maharashtra board 10th and 12th results 2025 चा निकाल तुमच्या स्क्रिनवर दिसेल.
५. यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या.

महाराष्ट्र बोर्डाचा निकाल एसएमएसद्वारे कसा पहावा (How to Search Maharashtra Board Result)

१. तुमच्या मोबाइलमध्ये एसएमएसचं अॅप घ्या.
२. यामध्ये महाराष्ट्र बोर्ड इयत्ता १०वी निकाल २०२५ साठी MHSSC सीट क्रमांक टाइप करा .
३. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता १२वी निकाल २०२५ साठी MHHSC सीट क्रमांक टाइप करा .
४. त्यानंतर ५७७६६ वर एसएमएस पाठवा.

निकालानंतर किती दिवसांनी मिळतील गुणपत्रिका ?

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून निकाल जाहीर केल्यांतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप केले जाते. विद्यार्थ्यांना शाळेत तसेच महाविद्यालयात गुणपत्रिकेची ओरिजनल हार्ड कॉपी देण्यात येईल.

महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता १०वी आणि १२वीच्या निकाल २०२५ मध्ये नमूद केलेले तपशील खालीलप्रमाणे

१. विद्यार्थ्याचे नाव
२. पालकांची नावे
३. हजेरी क्रमांक
४. जन्मतारीख
५. शाळेचे नाव
६. विषयांची नावे
७. प्रत्येक विषयासाठी थिअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्हीमध्ये मिळालेले गुण
८. एकूण गुण मिळाले
९. निकालाची स्थिती
१०. शेरा