scorecardresearch

१२ वी पास ते पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्याची उत्तम संधी; आत्ताच अर्ज करा

​CME Pune Vacancy 2023: CME पुणेने भरती अधिसूचना जारी करून १०० हून अधिक पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेसाठी उमेदवार २५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतात.

job opportunity
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

CME Pune Jobs 2023: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. CME पुणे ने भरती अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार CME पुणे येथे विविध पदांवर भरती होणार आहे. ज्यासाठी उमेदवार अधिकृत साइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला अधिकृत साइट cmepune.edu.in वर जाऊन अर्ज करावा लागेल. या मोहिमेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ फेब्रुवारी २०२३ निश्चित करण्यात आली आहे.

CME Pune Jobs 2023: रिक्त पदांचा तपशील

CME पुणे मध्ये या भरती मोहिमेद्वारे एकूण ११९ पदांची भरती केली जाईल. ज्यामध्ये अकाउंटंट, मेकॅनिक आदी पदांचा समावेश आहे.

CME Pune Jobs 2023: शैक्षणिक पात्रता

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे
मॅट्रिक/१२वी/ग्रॅज्युएशन/आयटीआय आणि मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेमधून संबंधित क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असावा.

CME Pune Jobs 2023: वयोमर्यादा

या मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे असावे. तर पदानुसार अर्जदाराचे वय २५/३० वर्षे निश्चित करण्यात आले आहे. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

( हे ही वाचा: LIC Recruitment 2023: LIC मध्ये ९३९४ पदांसाठी मोठी भरती; जाणून घ्या अर्ज कसा कराल)

CME Pune Jobs 2023: अशी करण्यात येईल निवड

उमेदवारांच्या निवडीसाठी लेखी चाचणी / कौशल्य चाचणी / प्रात्यक्षिक चाचणी आयोजित केली जाईल. लेखी परीक्षेतील सर्व प्रश्न बहुपर्यायी असतील, ज्यामध्ये सामान्य इंग्रजी, सामान्य जागरूकता, संख्यात्मक योग्यता इत्यादी विषयांमधून प्रश्न विचारले जातील. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

CME Pune Jobs 2023: अर्ज कसा करायचा

उमेदवारांनी या भरती मोहिमेसाठी अधिकृत साइट cmepune.edu.in ला भेट देऊन अंतिम तारीख २५ फेब्रुवारी २०२३ पूर्वी अर्ज करावा. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात.

मराठीतील सर्व करिअर ( Career ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 18:04 IST