CRPF Recruitment 2023: केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून कॉन्स्टेबल पदांसाठी ९२१२ पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०२३ आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल भरती २०२३ बद्दलची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा,भरतीचे ठिकाण आणि शाररीक पात्रता याबबतची अधिकची माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव. ट्रेड आणि प्रत्येक ट्रेडसाठी पुरुष आणि महिलांसाठी एकूण जागा किती आहेत ते खालीलप्रमाणे –

पदाचे नावट्रेडरिक्त पदे
(पुरुष)
रिक्त पदे
(महिला)
ड्राइवर२३७२००
मोटर मेकॅनिक वेहिकल ५४४००
कॉबलर १५१००
कारपेंटर १३९००
टेलर २४२००
ब्रास बँड १७२२४
कॉन्स्टेबल (टेक्निकल आणि ट्रेड्समन)पाईप बँड५१००
बुगलर १३४०२०
गार्डनर ९२००
पेंटर ५६००
कुक/ वॉटर कॅरिअर २४२९ ४६
वॉशर मॅन४०३ ०३
बार्बर ३०३००
सफाई कर्मचारी ८११ १३
हेअर ड्रेसर ००

शैक्षणिक पात्रता –

१० वी उत्तीर्ण किंवा संबंधित विषयात आयटीआय (ITI) (अधिकच्या माहितीसाठी जाहिरात अवश्य पाहा)

शारीरिक पात्रता –

खुल्या प्रवर्गासाठी उंची –

पुरुष – १७० सें.मी.

महिला – १५७ सें.मी.

खुल्या प्रवर्गातील पुरुष छाती –

हेही वाचा- भारतीय नौदलात काम करण्याची सुवर्णसंधी! अधिकारी पदांसाठी बंपर भरती, पगार व अर्जाची पद्धत जाणून घ्या

  • ८० सें.मी. व फुगवून ५ सें.मी. जास्त

मागासवर्गीय उंची –

पुरुष – १६२.५ सें.मी.

महिला – १५० सें.मी.

मागासवर्गीय पुरुष छाती –

७६ सें.मी. व फुगवून ५ सें.मी. जास्त

वयोमर्यादा –

वयोमर्यादेसाठी (https://crpf.gov.in/writereaddata/Portal/Recruitment_Advertise/ATTACHMENTS/263_1/1_145032023.pdf) या लिंला भेट द्या आणि अधिकृत जाहिरात पाहा –

हेही वाचा- महावितरणमध्ये ‘या’ जागांसाठी भरती, १० वी पास असाल तर आजच करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर

भरतीसाठी फी

ओपन/ OBC/ EWS – १०० रुपये

मागासवर्गीय/ महिला – फी नाही

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारतात कुठेही

महत्वाच्या तारखा –

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – २७ मार्च २०२३

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ एप्रिल २०२३

हेही पाहा- Indian Army Recruitment 2023 : भारतीय सेनेत नोकरीची संधी! ‘या’ ७१ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकला अवश्य भेट द्या. https://crpf.gov.in/writereaddata/Portal/Recruitment_Advertise/ATTACHMENTS/263_1/1_145032023.pdf