वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय (DMER) मुंबई येथे विविध पदांसाठी मेगा भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. आरोग्य संचालनालय अंतर्गत तब्बल ५ हजारांहून अधिक पदांची भरती करण्यात आली आहे. तर ही भरती कोणत्या पदासांसाठी केली जाणार आहे, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पुढील पदासांठी केली जाणार भरती –

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई अंतर्गत प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ग्रंथपाल, स्वच्छता निरिक्षक, ई.सी.जी. तंत्रज्ञ, आहारतज्ञ, औषधनिर्माता, डॉक्युमेंटालिस्ट / कॅटलॉगर/प्रलेखाकार/ग्रंथसूचीकार, समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय), ग्रंथालय सहाय्यक, व्यवसायोपचारतज्ञ/ ऑक्युपेशनथेरेपीस्ट / व्यवसायोपचार तंत्रज्ञ, दुरध्वनीचालक, महिला अधिक्षीका / वॉर्डन वसतीगृह प्रमुख/ वसतीगृह अधिक्षीका, अंधारखोली सहाय्यक, क्ष-किरण सहाय्यक, सांखिकी सहाय्यक, दंत आरोग्यक/ दंतस्वास्थ आरोग्यक, भौतिकोपचारतज्ञ, दंत तंत्रज्ञ, सहाय्यक ग्रंथपाल, श्रवणमापकतंत्रज्ञ / ऑडियोव्हिजनल तंत्रज्ञ / ऑडीयोमेट्रीक तंत्रज्ञ, विद्युत जनित्र चालक / जनरेटर ऑपरेटर, नेत्रचिकित्सा सहाय्यक, डायलेसिस तंत्रज्ञ, शारिरिक शिक्षण निर्देशक / शारिरिक प्रशिक्षण निर्देशक, शिंपी, सहाय्यक दंत तंत्रज्ञ, मोल्डरूम तंत्रज्ञ, लोहार / सांधाता, वाहनचालक, गृह नि वनपाल / गृहपाल/ लिनन किपर, क्ष किरण तंत्रज्ञ, सुतार, कातारी- नि जोडारी, जोडारी मिश्री / बॅचफिटर, अधिपरिचारीका, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक, अधिपरिचारिका. या पदांच्या हजारो रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

हेही वाचा- सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ‘या’ ८२ पदांसाठीची भरती जाहीर, जाणून घ्या पात्रता निकष

वरील पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तर या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मे २०२३ आहे.

पद सख्या – ५०००+ जागा (स्टाफ नर्स : ३०००+)

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून शैक्षणिक पात्रतेच्या सविस्तर माहितीसाठी http://www.med-edu.in या बेवसाईटला अवश्य भेट द्यावी.

नोकरी ठिकाण – महाराष्ट्रातील विविध जिल्हे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

हेही वाचा- सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे येथे नोकरीची संधी! लवकरच ‘या’ ३१३ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या सविस्तर

वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षापर्यंत.

अर्ज पाठवण्याचा पत्ता – संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई.

महत्वाच्या तारखा –

अर्ज सुरु होण्याची तारीख – १० मे २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ मे २०२३

परीक्षा शुल्क –

खुला प्रवर्ग – १०००/- + बँक चार्जेस

मागास वर्गीय/ आर्थिक दुर्बल/ अनाथ – ९००/- + बँक चार्जेस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भरती संबंधित अधिकच्या माहितीसाठी http://www.med-edu.in या अधिकृत वेबसाईटला अवश्य भेट द्यावी. तसेच उमेदवारांनी वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता या संबंधित सविस्तर माहितीसाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या अधिकृत बेवसाईटला भेट द्यावी.