ESIC Pune recruitment 2024 : पुण्यातील कर्मचारी राज्य विमा महामंडळात विशेषज्ञ, ज्येष्ठ निवासी, आयुर्वेदिक चिकित्सक या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी थेट भरती [walk in interview] होणार आहे. या संस्थेत नोकरीच्या किती जागा उपलब्ध आहेत? तसेच, वेतन आणि भरतीची तारीख काय आहे ते जाणून घ्या.

ESIC Pune recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

विशेषज्ञ [पूर्णवेळ / अर्धवेळ] – १ जागा
ज्येष्ठ निवासी – ८ जागा
आयुर्वेदिक चिकित्सक [अर्धवेळ] – १ जागा
एकूण भरतीसाठी १० जागा रिक्त आहेत.

ESIC Pune recruitment 2024 – कर्मचारी राज्य विमा महामंडळ – पुणे अधिकृत वेबसाईट –
https://www.esic.gov.in/

ESIC Pune recruitment 2024 – अधिसूचना –
https://www.esic.gov.in/attachments/recruitmentfile/8ef6b6bd26eb83a9de8a23f593dbde8e.pdf

हेही वाचा : Manmad Nagar Parishad recruitment 2024 : मनमाड नगर परिषदेत नोकरीची संधी! अर्ज प्रक्रिया पाहा

ESIC Pune recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

विशेषज्ञ – पीजीसह एमबीबीएस पदवी
ज्येष्ठ निवासी – पीजीसह एमबीबीएस पदवी अथवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित स्पेशॅलिटीमध्ये पीजी डिप्लोमा
आयुर्वेदिक चिकित्सक – मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा वैधानिक मंडळ किंवा कौन्सिल किंवा भारतीय वैद्यक विद्याशाखेतून आयुर्वेदातील पदवी

ESIC Pune recruitment 2024 : वेतन

विशेषज्ञ [पूर्णवेळ / अर्धवेळ] – दरमहा १,५९,३३४/- रुपये
ज्येष्ठ निवासी – दरमहा १,३६,८८९/- रुपये
दरमहा ६७,७००/-
आयुर्वेदिक चिकित्सक [अर्धवेळ] – दरमहा रुपये ५०,०००/- रुपये

ESIC Pune recruitment 2024 : मुलाखतीची तारीख

वरील नमूद केलेल्या पदांसाठी थेट मुलाखतींद्वारे निवड करण्यात येणार आहे.
मुलाखतीकरिता उमेदवारांनी आवश्यक सर्व त्या कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
मुलाखतीची तारीख १ व २ मार्च २०२४, अशी आहे.
मुलाखतीसाठी खाली दिलेला पत्ता पाहा
मुलाखतीचा पत्ता – ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी पुणे, सर्व्हे नं. ६९०, बिबवेवाडी, पुणे-३७
इच्छुक उमेदवारास वरील कोणत्याही पदाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास पुण्यातील कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अथवा या संदर्भातील अधिसूचना वाचावी. वेबसाईट आणि अधिसूचनेची लिंक वर नमूद केलेली आहे.