१९८६ साली भारत सरकारच्या कापड व वस्त्रोद्याोग मंत्रालयाच्या पुढाकाराने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेच्या आज रोजी बंगळुरू, भोपाळ, चेन्नई, गांधीनगर, हैदराबाद, कानपूर, कोलकाता, मुंबई, दिल्ली, रायबरेली, पाटणा, पंचकुला, शिलॉंग, कांगरा, जोधपूर, भुवनेश्वर आणि श्रीनगर या सतरा शहरांमध्ये शाखा आहेत. त्यामध्ये बारावीनंतर फॅशन डिझायनिंग, लेदर डिझायनिंग, टेक्सटाइल डिझायनिंग,अॅक्सेसरी डिझायनिंग, निटवेयर डिझायनिंग, फॅशन कम्युनिकेशन आणि अॅपरल कम्युनिकेशन हे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत. यामध्ये उपलब्ध चार हजार जागांसाठी राष्ट्रीय स्तरावरील सीईटी नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत रविवार ९ फेब्रुवारी २०२५ रोजी घेतली जाणार आहे.

ही परीक्षा देशभरातील ६० शहरात होणार असून महाराष्ट्रातील पुणे, ठाणे, मुंबई व नागपूर या शहरात ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेत दोन पेपर असणार आहेत ज्यातील पहिला पेपर – ‘जनरल अॅबिलिटी टेस्ट’ – दोन तासांचा असेल. हा कॉम्प्युटर वर होईल ज्यामध्ये इंग्रजी ६० मार्क (४० प्रश्न) , अंकगणित २० मार्क (२० प्रश्न) , लॉजिक २५ मार्क (१५ प्रश्न) , सामान्य ज्ञान १५ प्रश्न (२५ मार्क ) असे विभाग असतील. दुसरा पेपर एक तासाचा असेल जो सृजनशीलता क्षमता मापनाचा असेल ज्यामध्ये विद्यार्थ्यांची स्केचिंग, निरीक्षण क्षमता आणि डिझाईन सेन्सिटीव्हिटी यांची तपासणी होईल. या परीक्षेतून निवडलेल्या विद्यार्थ्यांना सिच्युएशन टेस्टला सामोरे जावे लागेल. यातून विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाईल. या परीक्षेसाठी विद्यार्थी ६ जानेवारी २०२५ (लेट फी सह ९ जानेवारी २०२५) पर्यंत ऑनलाईन पद्धतीने https:// exams. nta. ac. in/ NIFT या संकेतस्थळावर अर्ज भरू शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्या विद्यार्थ्यांना नाविन्याची आवड आहे, ज्यांच्याकडे सृजनशीलता आहे आणि चांगली स्केचिंग कला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी फॅशन / अॅपरल डिझायनिंग हे उत्कृष्ट करिअर आहे. यामध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना फॅशन डिझायनर, फॅशन स्टायलिस्ट, टेक्सटाइल डिझायनर, रिटेल मॅनेजमेंट, फुटवेअर डिझायनर अशा विविध करीअर पर्याय उपलब्ध होऊ शकतात. याकरताचे सर्वोत्तम आणि अद्यायावत शिक्षण देणारी सरकारी संस्था म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी. गेल्या जवळपास सत्तर वर्षांपासून या संस्थेने जागतिक स्तरावर नावाजलेले विद्यार्थी घडवले आहेत. अद्यायावत तंत्रज्ञान, सोयीसुविधा, उत्तम अध्यापक वर्ग यामुळे ही संस्था जगभरात नावाजलेली आहे. या संस्थेत मास्टर्स आणि अगदी पीएचडीपर्यंत शिक्षणाच्या सोयी उपलब्ध आहेत. त्यामुळे फॅशन डिझायनिंग क्षेत्रात करिअर करू इच्छित असलेल्या विद्यार्थी , विद्यार्थिनींना या संस्थेत प्रवेशाच्या संधीचा जरूर फायदा घ्यावा.