भारतीय गुप्तचर संस्थेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे गुप्तचर विभागाने काही जागांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीअंतर्गत कनिष्ठ गुप्तचर अधिकारी पदांच्या ७९७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घेऊया.
पदाचे नाव – ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर – ग्रेड II (टेक्निकल).
एकूण रिक्त पदे – ७९७
शैक्षणिक पात्रता –
इलेक्ट्रोनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेली-कम्म्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्म्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेकट्रोनिक्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि/ कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर इंजिनीअरिंग/ कॉम्प्युटर अँप्लिकेशन विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स/ फिजिक्स/ मॅथेमॅटिक्स विषयात पदवी किंवा कॉम्प्युटर अँप्लिकेशन विषयात पदवी असणे आवश्यक.
वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग – १८ ते २७ वर्षांपर्यंत.
- ओबीसी – ३ वर्षांपर्यंत सूट.
- मागासवर्गीय – वर्षांपर्यंत सूट.
अर्ज शुल्क –
खुला/ ओबीसी/ EWS – ५०० रुपये.
मागासवर्गीय/ महिला/ माझी सैनिक – ४५० रुपये.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.
महत्वाच्या तारखा –
- ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – ३ जून २०२३
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ जून २०२३
अधिकृत बेवसाईट – https://www.mha.gov.in/en
गुप्तचर विभागाच्या भरती संबंधित अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी https://drive.google.com/file/d/1lX4LyZVE2lQl5U9C216-LOyhFoG8gE7M/view या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ib recruitment 2023 opportunity for graduates in intelligence department bharati for junior intelligence officer posts apply jap