Indian Overseas Bank Recruitment 2025 : सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधरांसाठी एक सुवर्णसंधी आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेने मोठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. स्थानिक बँक अधिकारी (LBO) या पदासाठी ही भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १२ मे २०२५ पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मे २०२५ आहे. परंतु उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी या भरती प्रक्रियेसंदर्भातील सविस्तर माहिती जाणून घ्यावी.

रिक्त पदाचे नाव आणि संख्या

स्थानिक बँक अधिकारी (LBO) – ४००

पात्रता

इंडियन ओव्हरसीज बँकेतील या नोकरीसाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असावी.

वयाची अट

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १ मे २०२५ दरम्यान २० ते ३० वर्ष असावे. यात SC/ST उमेदवारांना वयात ०५ वर्षे तर OBC उमेदवारांना ३ वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरीचे ठिकाण

महाराष्ट्र, तामिळनाडू, ओडिशा, गुजरात, पश्चिम बंगाल, & पंजाब

अर्ज शुल्क

इंडियन ओव्हरसीज बँकेत नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे. यात सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी ८५० रुपये तर अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागास प्रवर्गासाठी १७५ रुपये शुल्क आकारण्यात आले आहे.

असा करा अर्ज

१) सर्वप्रथम www.iob.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
२) यानंतर ‘Recruitment of LBO 2025’ या विभागात ‘Apply Online’ लिंकवर क्लिक करा.
३) आता प्रथम नोंदणी करा.
४) नंतर संपूर्ण माहिती भरुन अर्जात पासपोर्ट साईज फोटो,आधार किंवा पॅनकार्ड, वयाचा पुरावा, सेवानिवृत्ती व अनुभव प्रमाणपत्रे, आणि पत्त्याचा पुरावा अशी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
५) यानंतर अर्ज शुल्क भरुन फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट आऊट काढा.

इंडियन ओव्हरसीज बँकेची अधिकृत वेबसाईट

https://www.iob.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक

//ibpsonline.ibps.in/ioblboapr

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अधिकृत जाहिरात लिंक

https://www.iob.in/upload/CEDocuments/IOB-Recruitment-of-Local-Bank-Officer-2025-26.pdf