Indian Railways announced recruitment: सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने असिस्टंट लोको पायलटच्या पदांसाठी भरती सुरु आहे. भारतीय रेल्वेने देशभरातील ३४६ केंद्रांवर २२.५ लाख अर्जदारांची तपासणी करून १८,७९९ सहाय्यक लोको पायलट पदे भरण्यासाठी एक व्यापक भरती मोहीम जाहीर केली आहे. गेल्या सोमवारपासून सुरू झालेली भरती परीक्षा शुक्रवारी संपणार आहे.

“आतापर्यंत १३.५ लाख उमेदवारांनी आधीच परीक्षा दिली आहे आणि उर्वरित ९ लाख शेवटच्या दोन दिवसांत परीक्षेला बसतील.” असे रेल्वे बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांसाठी नियुक्तीसाठी जबाबदार असलेल्या रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) द्वारे ही भरती व्यवस्थापित केली जाते.

परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी, रेल्वे बोर्डाने रेल्वे भवन, नवी दिल्ली येथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी सुसज्ज केंद्रीकृत नियंत्रण केंद्र स्थापन केले आहे. येथून सर्व परीक्षा केंद्रांवरील परीक्षांचे प्रत्यक्ष रिअल-टाइम आधारावर निरीक्षण केले जाईल. “अनेक अधिकारी परीक्षा पारदर्शकता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सतत पहारा देत आहेत,” अधिकाऱ्याने नमूद केले.

RRB भर्ती कॅलेंडर

परीक्षा वेळापत्रकानुसार होतील याची खात्री करण्यासाठी RRB ने फेब्रुवारीमध्ये वार्षिक भर्ती कॅलेंडर जारी केले आहे. पूर्वी भरती मोहिमेचा अंदाज कमी असायचा पण आता वेळापत्रक सुव्यवस्थित केले गेले आहे. RRB द्वारे भरतीच्या अधिसूचना वर्षातून चार वेळा प्रसिद्ध केल्या जातात ज्यामुळे उमेदवारांना सहभागी होण्याची अधिक संधी मिळेल आणि वयोमर्यादा देखील कमी होईल. जानेवारी ते मार्च या कालावधीत सहाय्यक लोको पायलटच्या रिक्त जागा सोडल्या जातील.

हेही वाचा >> सरकारी नोकरी करण्याची संधी; जम्मू-काश्मीर पोलिसांमध्ये उपनिरीक्षक पदांसाठी भरती; कसा कराल अर्ज? जाणून घ्या

RBB कॅलेंडरचे फायदे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

RRB कॅलेंडरमधील बदल उमेदवारांना परीक्षा उत्तीर्ण होण्याची अधिक संधी देईल. उदाहरणार्थ, जर उमेदवार पहिल्या तिमाहीत सहाय्यक लोको पायलट पदासाठी पात्र ठरू शकला नाही, तर तो दुसऱ्या तिमाहीत अर्ज करण्यास पात्र असेल. एक मात्र अट असेल की ते संबंधित पदासाठी पात्र असायला हवे. भारतीय रेल्वेचा हेतू प्रक्रिया सुव्यवस्थित करण्याचा आहे जेणेकरून इच्छुक उमेदवार संधीचा लाभ घेऊ शकतील.