IREL Recruitment 2024: इंडियन रेअर अर्थ लिमिटेडने (Indian Rare Earths Limited ) भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. १२ वी पास उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहेत. ‘ट्रेडस्मन ट्रेनी’ (Tradesman Trainee) पदाच्या काही जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार या अधिकृत वेबसाईटवर https://www.irel.co.in/ ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२४ असणार आहे.

IREL Recruitment 2024: भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे, पगार, अर्ज फी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

रिक्त पदे आणि पदसंख्या : इंडियन रेअर अर्थ लिमिटेडमध्ये ‘ट्रेडस्मन ट्रेनी’च्या (Tradesman Trainee) ६७ रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराच्या पदानुसार त्याची शैक्षणिक पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.
लिंक : https://www.irel.co.in/documents/20126/167125/Detailed+Advt+No.+CO_HRM_26_2023-all+unit_Final_Eng.pdf/a8d2a3df-8fcd-2a68-adf6-d297e05c00d4?t=1708681144784

हेही वाचा…RITES Recruitment 2024: RITES मध्ये निघाली ‘या’ पदांसाठी भरती; कुठे आणि कसा कराल अर्ज? जाणून घ्या…

नोकरीचे ठिकाण : मुंबई

वयोमर्यादा : ३५ वर्षे

अर्ज शुल्क : ५०० रुपये.

पगार : ट्रेडस्मन ट्रेनी या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना कंपनीच्या धोरणानुसार प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्त केले जाईल आणि त्यांना एकत्रित वेतन दिले जाईल. त्यामध्ये २०,००० रुपये आणि वैद्यकीय सुविधा यांचा समावेश असेल. तसेच निवडलेले उमेदवार एक वर्षाच्या कालावधीसाठी प्रशिक्षणावर असतील; त्यांना २२,००० ते ८८,००० रुपये वेतन असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावी. उमेदवाराने अधिसूचनेत नमूद केलेल्या माहितीनुसार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अशा प्रकारे उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.