Intelligence Bureau Bharti 2023: गुप्तचर विभागात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो येथील भरतीसाठीची एक अधिसूचना गृह मंत्रालयाने जाहीर केली आहे. ज्यामध्ये कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (RO), ग्रेड-II (तांत्रिक) पदांसाठीची भरतीची माहिती देण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंटेलिजन्स ब्युरो भरती २०२३ –

पदाचे नाव – कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (RO), ग्रेड-II (तांत्रिक)

पदसंख्या – ७९७ जागा

हेही वाचा- सिडकोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! कंपनी सचिव पदासाठी भरती सुरु, महिना २ लाखांहून अधिक पगार मिळणार

नोकरी ठिकाण – मुंबई, नागपूर

वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे

अर्ज शुल्क –

UR, OBC, आणि EWS पुरुष उमेदवार – ५५० रुपये.

इतर श्रेणीतील उमेदवार आणि महिला – ४५० रुपये.

अर्ज करण्याची पद्धती – ऑनलाईन

महत्वाच्या तारखा –

अर्ज सुरू होण्याची तारीख – ३ जून २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ जून २०२३

अधिकृत वेबसाईट – http://www.mha.gov.in

शैक्षणिक पात्रता –

कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (RO), ग्रेड-II (तांत्रिक) – Engg. Diploma in ECE/ EEE/ IT/ CS, B.Sc.,Degree in Computer Applications. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून यासाठी भरतीची मूळ जाहिरात पाहावी.

पगार –

या भरतीअंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना २५ हजार ५०० ते ८१ हजार १०० रुपयांपर्यंत पगार मिळणार.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Intelligence bureau bharti 2023 opportunity for graduates to get a job in the ib department recruitment for 797 posts jap
First published on: 30-05-2023 at 14:36 IST