Job Interview Tips And Tricks : सध्या चांगली नोकरी मिळणे हे फार कठीण झालं आहे. अशात जर तुमच्याकडून इंटरव्ह्यूमध्येच नकळतपणे काही चुका झाल्या तर हातातून नोकरीची संधी गेली म्हणून समजा. कारण इंटरव्ह्यूदरम्यान बायोडेटासह तुमच्या बोलण्याची पद्धत, लूक, बसण्याची स्टाइल तसेच स्वत:ला कसे प्रेजेंट करता या सर्व गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिले जाते. त्यामुळे टेन्शन न घेता तुम्हाला आत्मविश्वासाने बोलावे लागते. पण इंटरव्ह्यूदरम्यान कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याविषयी जाणून घेऊ…

१) चांगले कपडे

तुमच्या कपड्यांवरुन तुमचं व्यक्तिमत्व ठरवलं जातं. त्यामुळे इंटरव्ह्यूला जाताना टीशर्ट, जीन्स पँट तसेच भडक रंगाचे कपडे घालणं शक्यतो टाळाचं. त्याऐवजी स्वच्छ, इस्त्री केलेले फॉर्मल शर्ट, पँट घाला. मुलींकडे आणखी एक ऑप्शन आहे ते म्हणजे लाईट रंगाचा कुर्ता, लेहंगा किंवा प्लाजो पँट घालू शकतात.

२) वेळ

इंटरव्ह्यूसाठी दिलेली वेळ पाळा. जर तुम्ही उशिरा पोहोचलात आणि ट्रॅफिकमध्ये अडकलो किंवा अलार्म वाजलाच नाही अशी कारणं दिली तर इंटरव्ह्यू घेणाऱ्याच्या नजरेत तुमच्याविषयी एक वाईट प्रतिमा तयार होते. त्यामुळे इंटरव्ह्यूसाठी दिलेल्या वेळेच्या १५ मिनिटे आधी पोहोचा.

३) पगार

जर तुम्ही इंटरव्ह्यूच्या सुरुवातीलाच पगाराविषयी बोलण्यास सुरुवात केली तर तुम्हाला नोकरीपेक्षा आधी पैसा जास्त महत्वाचा आहे असा समज होतो. त्यामुळे आधी इंटरव्ह्यूदरम्यान स्वत:ला चांगल्याप्रकारे प्रेजेंट करा, त्यानंतर इंटरव्ह्यू घेणारा तुम्हाला पगाराविषयी विचारेल तेव्हा त्याविषयी सविस्तर बोला.

४) फोन उचलणे

इंटरव्ह्यूला जाताना शक्यता मोबाईल सायलेंटवर ठेवा. जेणेकरुन कॉल आला तरी रिंगचा आवाज येणार नाही. जर तुम्ही सायलेंट करणं विसरलात आणि मोबाईल वाजलाच तर लगेच उचलून बोलू नका कट करा, कारण हे दिसताना खूप वाईट दिसतं आणि इंटरव्ह्यू घेणारा तो एकप्रकारे अपमान समजतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५) जुन्या ऑफिसविषयी वाईट बोलणं

इंटरव्ह्यूदरम्यान तुम्ही आधीचा बॉस, टीम किंवा कंपनीविषयी जेव्हा वाईट बोलता तेव्हा तुम्ही सर्व दोष त्यांच्यावर टाकता. त्यामुळे इंटरव्ह्यू घेणाऱ्यालाही वाटेल की, तुम्ही भविष्यात ही नोकरी सोडली तर त्यांच्याविषयी किंवा या कंपनीविषयी देखील वाईट बोलाल. यावरुन तुम्हालाच तो वाईट ठरवेल, त्यामुळे इंटरव्ह्यूदरम्यान कधीही आधीच्या कंपनीविषयी वाईटसाईट गोष्टी बोलणं टाळा.