Intelligence Bureau Bharti 2023: भारतीय गुप्तचर संस्थेत (Ministry of Home Affairs) नोकरीची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. गुप्तचर विभागाने विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या अंतर्गत सुरक्षा सहाय्यक/मोटार वाहतूक, मल्टी टास्किंग कर्मचारी या पदांच्या एकूण ६७७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इंटेलिजन्स ब्युरो भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि पगार या बाबतची माहिती जाणून घेऊया.
इंटेलिजन्स ब्युरो भरती २०२३ –
पदाचे नाव – सुरक्षा सहाय्यक/मोटार वाहतूक, मल्टी टास्किंग कर्मचारी.
एकूण पदसंख्या – ६७७
शैक्षणिक पात्रता – १० वी पास.
नोकरीचे ठिकाण – मुंबई, नागपूर.
वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे
अर्जाची पद्धत – ऑनलाईन.
महत्वाच्या तारखा –
- अर्ज सुरू होण्याची तारीख – १४ ऑक्टोबर २०२३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ नोव्हेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – http://www.mha.gov.in
पगार –
सुरक्षा सहाय्यक/मोटार वाहतूक – २१ हजार ७०० रुपये ते ६९ हजार १०० रुपये.
मल्टी टास्किंग कर्मचारी – १८ हजार ७०० रुपये ते ५६ हजार ९०० रुपये.
भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/16qVMI5bKpiPBXQWH9Z7TAXmgbFYzDv9W/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.