Maharashtra Anganwadi Bharti 2023: महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प यांच्या अंतर्गत असणाऱ्या विविध जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी मदतनीस पदासाठीची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण ४८० जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तर ही भरती केवळ महिला उमेदवारांसाठी असणार आहे. अंगणवाडी मदतनीस भरती २०२३ बद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
अंगणवाडी मदतनीस भरती २०२३ –
पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
एकूण पद संख्या – ४८०
शैक्षणिक पात्रता –
- १२ वी पास, मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक.
- भरतीसाठी फक्त महिला उमेदवार अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा –
उमेदवाराचे किमान १८ तर कमाल ३५ वर्षे वय असावे. (विधवा महिलांकरिता ४० वर्षे)
पगार –
भरतीअंतर्गत निवडलेल्या उमेदवारा महिना ५,५०० पगार देण्यात येणार आहे.
अंगणवाडी मदतनीस भरती २०२३ महत्वाच्या तारखा –
जिल्हा | अधिसूचना दिनांक | अर्ज सुरु होण्याची तारीख | अर्ज करण्याची शेवटची तारीख |
अकोला आणि वाशीम | १५ जून २०२३ | ३ जुलै २०२३ | १४ जुलै २०२३ |
बुलढाणा | १६ जून २०२३ | १६ जून २०२३ | ३० जून २०२३ |
अहमदनगर | १६ जून २०२३ | १९ जून २०२३ | ०३ जुलै २०२३ |
सातारा | १६ जून २०२३ | १६ जून २०२३ | ३० जून २०२३ |
मुंबई | १९ जून २०२३ | १९ जून २०२३ | २८ जून २०२३ |
अर्ज पाठवायचा पत्ता –
वाशीम आणि अकोला –
बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) कार्यालय, अकोला-वाशीम
सातारा – बाल विकास अधिकारी कार्यालय, सातारा पश्चिम, केदार बिल्डिंग, पहिला मजला, हॉटेल ग्रीन फील्ड शोजारी, सदर बाजार, सातारा ४१४००१
बुलढाणा – एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, देऊळगावराजा, बुलढाणा.
अहमदनगर – एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, बालेवाडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर, ४१३७०२
मुंबई – बाल विकास प्रकल्प अधिकारी, बोरीवली पश्चिम (नागरी), मुंबई यांचे कार्यालय, पहिला मजला, बृहन्मुंबई मनपा सुंदर नगर, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, पवन बाग रोड, विटटी इंटरनॅशनल स्कुल जवळ, एस. व्ही. रोड, गोरेगांव पश्चिम, मुंबई महाराष्ट्र, पिन कोड ४०००६४
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, सरकारी नोकरीची अधिसूचना अवश्य पाहा.