Maharashtra HSC Exam 2025: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. २०२५ मध्ये बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाच्या परिक्षेची अर्जप्रक्रिया सुरु होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे की, फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या बारावीच्या परिक्षेचे फॉर्म १ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२४ या कालावधीत ऑनलाइन उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांनी http://www.mahahsscboard.in या वेबसाइटवर आपले अर्ज भरावेत. २०२५ मध्ये बारावीच्या परीक्षा या ११ फेब्रुवारी २०२५ ते १८ मार्च २०२५ या काळात घेण्यात येणार आहे, तर दहावी बोर्डाच्या परीक्षा २१ फेब्रुवारी २०२५ ते १७ मार्च २०२५ यादरम्यान घेण्यात येणार आहे.

पडताळणी प्रक्रिया :

अर्ज कालावधी दरम्यान कॉलेज लॉगिनद्वारे यादी उपलब्ध करून दिली जाईल. यावेळी विद्यार्थ्यांनी आणि मुख्याध्यापकांनी पूर्व-यादीवर स्वाक्षरी आणि शिक्का मारणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या तारखा :

ऑनलाइन अर्ज कालावधी: ऑक्टोबर १ ते ३० ऑक्टोबर २०२४

ITI विद्यार्थ्यांसाठी अर्जाचा कालावधीः ऑक्टोबर २२ ते नोव्हेंबर ५ २०२४

वाढलेले अर्ज शुल्क

पेपरच्या वाढत्या किमतीमुळे यंदा अर्ज शुल्कात वाढ झाली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात १२% वाढ झाली आहे, परिणामी ५० रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाईल:

इयत्ता १० वी परीक्षा शुल्क: ४२० रुपयांवरून ४७० रुपये.

इयत्ता १२ ची परीक्षा फी: ४४० वरून ४९० रुपये.

परीक्षा शुल्काबरोबरच प्रशासकीय सेवा, गुणपत्रिका, प्रमाणपत्रे, प्रात्यक्षिक परीक्षांचा खर्चही वाढला आहे.

हेही वाचा >> ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याची थेट संधी; ‘या’ दोन जागांवर कंत्राटी पद्धतीने होणार भरती

SARAL प्रणालीमध्ये नावनोंदणी आवश्यक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज भरण्यासाठी SARAL प्रणालीमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे.हे महाराष्ट्रातील एक शैक्षणिक पोर्टल आहे ज्यामध्ये विद्यार्थी, शाळा आणि कर्मचारी पोर्टल समाविष्ट आहेत. अधिक माहितीसाठी, विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया आणि सरल प्रणालीबाबत त्यांच्या महाविद्यालयात जाणून माहिती घेणे.