Maharashtra State Co-Operative Bank Bharti 2023 Government Job For Marathi Person Where and How to Apply Know details | Loksatta

Maharashtra State Co-Operative Bank Bharti 2023: मराठी भाषिकांसाठी सुवर्णसंधी; कुठे व कसा कराल अर्ज?

Banking Jobs In Mumbai: २१ फेब्रुवारीपर्यंत या पदासाठी आपण अर्ज करू शकता. या नोकरीचे ठिकाण मुंबईत असणार आहे.

Maharashtra State Co-Operative Bank Bharti 2023 Government Job For Marathi Person Where and How to Apply Know details
मराठी भाषिक उमेदवारासाठी सुवर्णसंधी; कुठे व कसा कराल अर्ज? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Maharashtra State Co-Operative Bank Bharti 2023: महाराष्ट्र स्टेट कॉर्पोरेटीव्ह बँकेतर्फे उच्च पदावरील नोकरीसाठी भरती काढली आहे. जर आपणही सरकारी नोकरीच्या संधीच्या शोधात असाल तर आपल्यासाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते. सदर नोकरीबाबत जानेवारीमध्ये महाराष्ट्र स्टेट बँकेतर्फे घोषणा करण्यात आली होती व यासंदर्भात सरकारी पोर्टलवर सुद्धा अधिसूचना जारी करण्यात आली आहे. २१ फेब्रुवारीपर्यंत या पदासाठी आपण अर्ज करू शकता. या नोकरीचे ठिकाण मुंबईत असणार आहे. आपल्याला खाली दिलेल्या वेबसाइटवरून अर्जाची प्रत डाउनलोड करून दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. तत्पूर्वी ही नोकरी नेमकी कोणत्या पदासाठी तसेच यासाठी शैक्षणिक व अनुभवाच्या पात्रतेचे निकष काय आहेत हे आपण जाणून घेऊयात.

रिक्त पदाबाबत सविस्तर माहिती..

महाराष्ट्र स्टेट कॉर्पोरेटीव्ह बँकेत मॅनेजिंग डायरेक्टर या पदासाठी रिक्त जागा आहे. यासाठी अर्ज करताना उमेदवाराचे वय ६० च्या आत असावे. उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असावे. तसेच CAIIB/DBF/ कॉर्पोरेटीव्ह बिझनेसमधील डिप्लोमा असलेले पदवीधर किंवा व्यवस्थापन/ चार्टर्ड / कॉस्ट अकाउंटंट असल्यास आपल्याला प्राधान्य दिले जाऊ शकते.

अनुभव निकष

  • व्यक्तीला बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ/ मध्यम स्तरावरील किमान आठ वर्षांचा कामाचा अनुभव असावा.
  • उमेदवारांना आधुनिक बँकिंगचे व आयटीचे ज्ञान असायला हवे.
  • सहकारी बँकिंगचा अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
  • निवडलेल्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती निकषांच्या पूर्ततेच्या अधीन आहे

अर्ज कुठून डाउनलोड करावा?

https://mscbank.com/Careers.aspx

हे ही वाचा<< IIT Bombay मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ३५ हजार रुपये मिळणार पगार! कोणी, कधीपर्यंत व कसा करावा अर्ज?

इच्छुक उमेदवारांनी अर्ज कुठे पाठवावा?

Dy. महाव्यवस्थापक, एचआरडी आणि एम,
पत्ता: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन, ९, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई 400001

मराठीतील सर्व करिअर ( Career ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 16:34 IST
Next Story
एमपीएससी मंत्र : सामान्य विज्ञानाची तयारी